शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

संग्रामपूर: 'कोरोना फायटर्स'वर पुष्पांचा वर्षाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 16:50 IST

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचाविण्यासाठी  वरवट बकाल येथे पुष्प वर्षाव करून अनेकांचे स्वागत करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर: कोरोना संचारबंदीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्या कोरोना फायटर्स (माणसातील देवदूतांवर) शनिवारी पुष्पांचा वर्षाव करण्यात आला. प्रेस क्लबच्या विद्यमाने आयोजित कार्यक्रमात नागरिकांनीही सहभाग नोंदविला. वरवट बकाल येथे यावेळी सोशल डिस्टनसिंगची योग्य ती खबरदारी घेण्यात आली. कोरोनाच्या संकट काळात प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचाविण्यासाठी  वरवट बकाल येथे पुष्प वर्षाव करून अनेकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी  तामगावं पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे व कर्मचारी वृंद , संग्रामपुर तहसिलचे प्रभारी तहसिलदार समाधान राठोड व प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ मयुर वाडे यांचा सन्मान केला.  यावेळी शिक्षिका सौ  पुष्पाताई भोजने यांनी औक्षण केले. तर प्रेस क्लबचे अध्यक्ष भाऊ भोजने, हमीद पाशा ,सरपंच श्रीकृष्ण दातार, पोलिस पाटील  इंगळे , पत्रकार किशोर खडे, शेख अनिस, चंद्रप्रकाश कडू, सुनिल ढगे, सचिन पाटील, संगितराव भोंगळ, संतोष इघोकार, अभयसिंह मारोडे, विठ्ठल निंबोळकार, बाबुलाल इंगळे, महम्मद भाई आदी उपस्थित होते.प्रशासकीय दाम्पत्याचा अमिभान!बुलडाणा जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या जळगाव आणि संग्रामपूर येथे येण्यास सहजासहजी अधिकारी आणि कर्मचारी तयार होत नाहीत. मात्र, कोरोना संचारबंदी काळात  उपविभागीय महसूल अधिकारी वैशाली देवकर यांनी सर्वच विभागाचे अधिकारी कर्मचारी यांना अल्पावधीत कामाला लावले. तर पोलिस प्रशासनानेही उपविभागीय महसूल अधिकारी यांना साथ देत तालुक्यात आदरयुक्त भीती निर्माण करीत आपदकालीन तथा जीवनावश्यक सेवा सुरळीत ठेवण्याचे काम केले आहे. तामगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे व उपविभागीय महसूल अधिकारी जळगाव जा. वैशाली देवकर हे पती पत्नी अतीतटीच्या स्थितीत गाव, खेड्या, वस्त्यावर फिरून प्रशासनाला तयार ठेवले आहे. त्यामुळे या दाम्पत्याचाही सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरbuldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस