शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

उत्खननास बंदी असतानाही रेतीची वाहने रस्त्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 20:01 IST

रेती माफियांशी अर्थपूर्ण व्यवहारातून अनेक कारवाया दाबल्या जात असल्याची चर्चा आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : जिल्ह्यातील २५ रेती घाट वगळता उर्वरीत रेती घाटातून रेतीचे उत्खनन आणि वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, महसूल अधिकाºयांच्या कृपादृष्टीमुळे खामगाव आणि परिसरात रेतीची सर्रास अवैध तस्करी सुरू आहे. रेतीची वाहतूक आणि विक्री करणारी वाहने सर्रास रस्त्यावर फिरत असताना आढळून येतात. मात्र, रेती माफियांशी अर्थपूर्ण व्यवहारातून अनेक कारवाया दाबल्या जात असल्याची चर्चा आहे. शेगाव तालुक्यातील डोंगरखेड ए,बी, भेंडवळ बुदू्रक, खातखेड, कालवड, सगोडा, पाडसुळ, झाडेगाव, पाळोदी येथे मन नदी पात्र, संग्रामपूर तालुक्यातील भोन, भोनगाव, खिरोडा, दादुलगाव, जळगाव जामोद तालुक्यातील गोळेगाव बुद्रुक, खूर्द, माहुली एबी, या ठिकाणाहूनच रेती उत्खनन करणे शक्य आहे. मात्र, तरी देखील खामगाव शहरात जलंब-माटरगाव, नांदुरा, पिंपळगाव राजा, शेगाव, काळेगाव शिवारात मोठ्याप्रमाणात नदी आणि नाल्याच्या पात्रात रेतीचे उत्खनन करण्यात येत आहे. रात्रीची संचारबंदी झुगारून रेतीची चोरटी वाहतूक केली जात आहे. मात्र, याकडे महसूल प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.  ही वाहतूक रोखण्यासाठी तहसील विभागातून विशेष पथकाची नेमणूक सुद्धा करण्यात आली आहे. परंतु हे पथक रात्री १२ नंतर बंद होत असल्याने सर्रासपणे अवैधरित्याच्या गाड्या सुसाट वेगाने खामगावच्या रस्त्यावर धावताना दिसून येत आहे. प्रत्येकी सहा हजार रुपये ट्रीप असा रेतीचा दर असून दररोज शंभर ते सव्वाशे गाड्या रेती खामगाव शहर व परिसरात  पडत असल्याचे दिसून येत आहे. शहरात  मोठ- मोठी बांधकामे सुरू आहे तर अवैध वाळूचा व्यवसाय करणारे नागरिकही रेती पोचविण्याचे काम भल्या पहाटे तीनच्या नंतरच करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बंदी काळातही शहरात रेतीची अवैध   वाहतूक जोरात सुरू आहे. काही ठिकाणी नदीपात्रातील तर काही ठिकाणी नाल्याची रेती उत्खनन करण्याचे काम जोरात सुरू आहे. रेतीच्या चोरट्या वाहतुकीतून रेतीची लक्षावधी रुपयांची उलाढाल सुरू असल्याचेही समोर येत आहे. यासंदर्भात महसूल अधिकाºयांशी संपर्क साधला असता दोन गाड्या पकडल्याचे सांगत, त्यांनी पुढील माहिती देण्याचे टाळले.
टॅग्स :khamgaonखामगावsandवाळू