शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

परराज्यातून आयात होणाऱ्या वाळूला १० टक्के रॉयल्टी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 12:44 IST

10 per cent royalty on Sand स्वामित्व धनाच्या १० टक्के एवढी रक्कम प्रति ब्रास जिल्हा खनिज प्रतिष्ठानमध्ये जमा करणे बंधनकारक राहील.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : परराज्यातून जिल्ह्यात वाळू विक्री करण्यासाठी आणण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडे १० टक्के स्वामित्व धन भरणे आवश्यक आहे. हे स्वामित्व धन भरल्यासच संबंधितांना झीरो पास दिला जाणार असून, त्यायोगे जिल्ह्यात ही वाळू विक्री करता येणार आहे.जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव झाले नसल्याने परराज्यांतून मोठ्या प्रमाणात वाळू विक्रीसाठी आणली जात आहे.  कन्हान, गुजरातच्या वाळूला जिल्ह्यात मोठी मागणी असून, अनेक जण ही वाळू आणून त्याचा साठा करून ठेवतात. त्यानंतर गरजेनुसार वाळूची विक्री केली जाते. मात्र, आतापर्यंत या वाळूसंदर्भात प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नव्हती. त्यामुळे परराज्यांतून किती वाळूचा साठा येत आहे, ही वाळू परवाना घेऊन आली आहे का? याबाबतची माहिती उपलब्ध होत नव्हती. परिणामी जिल्ह्यासह परराज्यांतूनही मोठ्या प्रमाणात वाळू विक्री केली जात होती. त्यानुषंगाने शासनाने निर्धारित केलेले १० टक्के प्रति ब्रास याप्रमाणे जिल्हा खनिज प्रतिष्ठानमध्ये जमा करणे बंधनकारक केले आहे. परराज्यांतून रस्त्याने  आणलेली वाळू ज्या जिल्ह्याच्या हद्दीमध्ये प्रवेश करणार आहे. त्या जिल्हाधिकारी कार्यालयात आणि परराज्यातून रेल्वेने आणलेल्या वाळूसाठी ज्या रेल्वेस्थानकावर वाळू उतरविली जाणार आहे, त्या जिल्ह्यात संबंधिताने वेळोवेळी निर्धारित केलेल्या स्वामित्व धनाच्या १० टक्के एवढी रक्कम प्रति ब्रास जिल्हा खनिज प्रतिष्ठानमध्ये जमा करणे बंधनकारक राहील. झीरो रॉयल्टी पासशिवाय वाहतूक केल्याचे आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

वर्षभरापासून वाळूची विक्री  जिल्ह्यात मागच्या एक वर्षापासून कन्हान, गुजरातची वाळू विक्री होत आहे. विशेष म्हणजे सहा ते सहा ब्रासचा एक ट्रक या प्रमाणे ही वाळू जिल्ह्यात आणली जात आहे. मागच्या काही दिवसांपासून या वाळूचा साठा करून विक्री होत आहे.

काय आहे प्रशासनाचा आदेश? उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी यासंदर्भातील आदेश काढला आहे. परराज्यातून आणलेली वाळूची वाहतूक करण्यासाठी संबंधित संस्था, व्यक्तीला राज्यामध्ये गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतुकीसाठीच्या संगणकीय प्रणालीमध्ये नोंदणी करणे बंधनकारक राहणार आहे.

टॅग्स :khamgaonखामगावsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग