शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

अभयारण्ये खुली होताच वाढली पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 10:48 AM

गत तीन महिने घरामध्ये बसून असलेले पर्यटक बाहेर पडले असून, जंगल भ्रमंतीसाठी गर्दी करीत आहेत.

- विवेक चांदूरकर लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोनामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे ओस पडली होती. गत काही दिवसांपूर्वीच ज्ञानगंगा व अंबाबरवा अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. त्यामुळे गत तीन महिने घरामध्ये बसून असलेले पर्यटक बाहेर पडले असून, जंगल भ्रमंतीसाठी गर्दी करीत आहेत. जिल्ह्यात लोणार, सिंदखेड राजा, अंबाबरवा व ज्ञानगंगा अभयारण्य, मैलगड, गोंधनापूरचा किल्ला आदी पर्यटनस्थळे आहेत. लोणार व सिंदखेड राजा येथे जगभरातून पर्यटक येतात. ज्ञानगंगा व अंबाबरवा अभयारण्ये गत तीन महिन्यांपासून पर्यटकांसाठी कोरोनामुळे बंद ठेवण्यात आली होती. मात्र गत आठवड्यात दोन्ही अभयारण्ये पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. गत तीन महिन्यांपासून कोरोनामुळे सर्वच जण घरात बसून आहेत. बाहेर फिरण्यासाठी कोणतीही मुभा नसल्यामुळे अनेकजण त्रस्त झाले होते. त्यातच ज्ञानगंगा अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आल्यानंतर दररोज पर्यटक अभयारण्यात फिरण्यासाठी गर्दी करीत आहेत. या अभयारण्यात सध्या टी वन वाघाचे वास्तव्य असल्याने वाघाचे दर्शन घेण्याकरिता पर्यटकांची उत्सूकता वाढली आहे. तसेच या अभयारण्यात बिबट, अस्वल, सांबर, चितळ, हरिण, नीलगाय, सायाळ, रानडुक्कर आदी प्राणी आहेत. मोर, पोपट, बदकासह अनेक पक्षीही अभयारण्यात निदर्शनास पडतात.अभयारण्यात फिरण्याकरिता बोथा येथे नोंदणी करावी लागत असून, तेथून वनविभागाच्या जीप्सीमध्ये पर्यटकांना जंगलात सफारीसाठी सोडण्यात येते. जिल्ह्याबाहेरील पर्यटक सुद्धा अभयारण्यात फिरण्यासाठी गर्दी करीत आहेत.

अभयारण्यात फिरण्याचे नियम बदललेज्ञानगंगा अभयारण्यात कोरोनामुळे फिरण्याचे नियम बदलण्यात आले आहेत. एका जिप्सीमध्ये आधी आठ जणांना बसविण्यात येत होते. आता मात्र एका कुटुंबातील असले तर चार आणि वेगवेगळे असले तर दोघांनाच बसविण्यात येते. तसेच अभयारण्यात जाण्यापूर्वी तपासणी करण्यात येत आहे. पर्यटकांनी मास्क लावणे आवश्यक आहे. अभयारण्यात असलेल्या ८ सुटपैकी केवळ दोनच सुट पर्यटकांसाठी राखीव करण्यात येत आहेत.

अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आल्यानंतर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. कोरोनामुळे घरात बसून त्रस्त झालेले नागरिक आता फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. दररोज पर्यटक गर्दी करीत आहेत. बोथा येथे नोंदणी करण्यात येत असून, तेथे पर्यटकांची तपासणी केल्यानंतर अभयारण्यात जिप्सीमध्ये फिरविण्यात येत आहे.-संतोष डांगे वनपरिक्षेत्र अधिकारी, ज्ञानगंगा अभयारण्य, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाdnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्य