शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

समृद्धी महामार्ग कंत्राटदाराला २१.६४ कोटींचा ठोठावला दंड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 06:09 IST

बुलडाण्यात शासकीय जमिनीतून अवैध गौण खनिज उत्खनन भोवले

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : समृद्धी महामार्गासाठी विनापरवानगी गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी सिंदखेड राजा तहसील कार्यालयाने कंत्राटदार कंपनीला २१ कोटी ६४ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड न भरल्यास राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांनी कंपनीच्या देयकातून तेवढी रक्कम वळती करण्याचे आदेशही तहसीलदारांनी दिले आहेत.

सिंदखेड राजा तालुक्यातील विझोरा येथील शासकीय ई क्लास जमिनीतून समृद्धी महामार्गाच्या पॅकेज ७ चे कंत्राट घेतलेल्या रोडवेज इंडिया इन्फ्रा लि. कंपनीने गेल्या वर्षी ३८ हजार ९९४.२१६ ब्रास गौण खनिजाचे उत्खनन केले होते. या संदर्भात तक्रार झाल्यानंतर प्रत्यक्ष मोजमाप करण्यात आले. त्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले. मोजमाप करण्यासही जवळपास एक वर्षाचा कालावधी लागला, हे विशेष.

सिंदखेड राजा येथील नायब तहसीलदार, संबंधित मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी एक अहवाल तहसीलदार यांना दिला होता. मात्र, विझोरा येथील ज्या भागात हे उत्खनन झाले होते, तो भाग डोंगराळ असल्याने त्याचे तांत्रिक मोजमाप आवश्यक होते. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे देऊळगाव राजा येथील उपविभागीय अभियंता आणि सिंदखेड राजाचे भूमी अभिलेखचे उपअधीक्षक यांना २८ जानेवारी २०२१ रोजी सूचना देण्यात आली. मात्र, मनुष्यबळ आणि तांत्रिक साहित्याचा अभाव असल्याने ते त्यावेळी झाले नव्हते. त्यानंतर पुन्हा एक पत्र देऊन मोजमाप करण्यात आले. या संदर्भातील अहवाल ८ फेब्रुवारी २०२२ रोजी देऊळगाव राजाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांनी सादर केला होता. रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रा लि.च्या अधिकाऱ्यांनाही माेजमापावेळी उपस्थित राहण्याबाबत नोटीस दिली होती. मात्र, त्यांचा कोणताही अधिकारी उपस्थित झाला नव्हता.

दंड भरण्यास ३० दिवसांची मुदतपॅकेज ७ चे कंत्राट घेतलेल्या रोडवेज इंडिया इन्फ्रा लि. या कंत्राटदार कंपनीला दंड भरण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे. ही रक्कम न भरल्यास कंपनीच्या देयकातून तेवढी रक्कम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांनी कपात करून शासनाकडे जमा करायची आहे.

यापूर्वी कंपन्यांना झालेला दंड१. मेसर्स मॉन्टे कार्लो कंपनी लि. (जालना) - ३२८ कोटी रुपये२. ॲपको इन्फ्राटेक प्रा. लि. (वाशिम) - ३.५५ कोटी३. ॲपको इन्फ्राटेक प्रा. लि. (बुलडाणा) - ३२ कोटी४. ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (वर्धा) - २३८ कोटी (दंड निश्चित) आणि २४५ कोटी (नोटीस) (काही प्रकरणे न्यायप्रविष्ट. जालन्याच्या प्रकरणात कंपनीचा दावा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला)

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग