शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

धन्य आजी दिन संत दर्शनाचा; ‘श्रीं’च्या पालखीचे खामगावात आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 17:25 IST

श्रींच्या दर्शनासाठी भर पावसातही भाविकांची गर्दी

खामगाव: विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या पालखीचे गुरूवारी सकाळी ८.५५ वाजता खामगावात आगमन झाले. यावेळी खामगाव येथील भाविकांनी श्रींच्या चरणी भक्तीभावानं अभिषेक केला.आषाढी एकादशीला कैवल्य साम्राज्याचे स्वामी भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी ‘श्रीं’ची पालखी शेगाव येथून पंढरपूरला रवाना झाली होती. आता श्रींची पालखी परतीच्या मार्गावर असून, गुरूवारी सकाळी खामगावात आगमन झाले. हनुमान विटामीन येथे पालखीचा पहिला मुक्काम झाला. याठिकाणी वारकऱ्यांना चहा आणि जेवण देण्यात आले. काही वेळ विश्रांतीनंतर ‘श्रीं’ची पालखी बाळापूर फैलमार्गे शहरात मार्गस्थ झाली. वाटेत ठिकठिकाणी श्रींच्या पालखीचे भाविकांनी मनोभावे स्वागत केले. एक दिवसाच्या मुक्कामात भाविकांनी माऊलींचा  श्रद्धेने पाहुणचार केला. शहरातील विविध सामाजिक संस्था, धार्मिक संस्थान, राजकीय पदाधिकारी आणि सेवाभावी भाविकांनी वारकऱ्यांसाठी चहा, नाश्ता आणि फराळाची व्यवस्था केली होती. आवार येथील मुक्कामानंतर गुरूवारी सकाळी ही पालखी खामगावकडे मार्गस्थ झाली. त्यावेळी सुरूवातीला टेंभुर्णा फाट्यावर आणि त्यानंतर बायपास चौकात पालखीचे स्वागत करण्यात आले.

दर्शनासाठी भाविकांची गर्दी!श्रींच्या दर्शनासाठी शहर आणि परिसरातील भाविकांनी एकच गर्दी केली होती. भर पावसातही भाविकांमध्ये श्रींच्या दर्शनाची ओढ दिसून आली. श्रींच्या पालखीचे आगमन होणार असल्याने, अनेक भाविक सकाळीच टेंभूर्णा फाट्यावर पोहोचले होते.

पोलिसही झाले वारकरी!श्रींच्या पालखीच्या अनुषंगाने चोख पोलिस बंदोबस्तासाठी खामगाव येथील पोलीस पहाटेच टेंभूर्णा येथे पोहोचले होते. उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष टाले, ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार रफीक शेख, पीएसआय रविंद्र लांडे, वाहतूक शाखेचे अरविंद राऊत यांच्यासह पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला. यावेळी टेंभूर्णा येथून सर्व पोलिस ताफा खामगावपर्यंत पायी पोहोचला.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा