शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आईचे छत्र हरवलेल्या ऋतुजाला मिळाला मायेचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:30 IST

चिखली: तालुक्यातील पेठ येथील मायेचे छत्र हरविलेल्या एका नऊ वर्षीय चिमुरडीला आधार देण्याचे काम चेके पाटील फाउंडेशनने केले आहे. आईचे छत्र हरविलेल्या या चिमुकलीचे पालकत्व स्वीकारून तिच्या पुढील आयुष्याची शैक्षणिक व आरोग्यविषयक जबाबदारी फाउंडेशनच्या संचालिका अर्चना चेके पाटील पार पडणार आहेत.

ठळक मुद्देचेके पाटील फाउंडेशनचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: तालुक्यातील पेठ येथील मायेचे छत्र हरविलेल्या एका नऊ वर्षीय चिमुरडीला आधार देण्याचे काम चेके पाटील फाउंडेशनने केले आहे. आईचे छत्र हरविलेल्या या चिमुकलीचे पालकत्व स्वीकारून तिच्या पुढील आयुष्याची शैक्षणिक व आरोग्यविषयक जबाबदारी फाउंडेशनच्या संचालिका अर्चना चेके पाटील पार पडणार आहेत.जेमतेम २६ वष्रे वय असलेल्या तालुक्यातील पेठ येथील रूपाली रमेश डुकरे यांचे काही दिवसांपूर्वी सर्पदंशाने निधन झाले. त्यांचे पती रमेश डुकरे हे आजारी असल्याने कुटुंबाचा सर्व भार त्यांच्या खांद्यावर होता. अत्यंत हालाखीची परिस्थिती असतानाही त्यांनी ही जबाबदारी सर्मथपणे पेलली होती. नऊ वर्षांची ऋतुजा व १३ वर्षांच्या युवराज या दोन चिमुकल्यांसह संपूर्ण कुटुंबाची गुजरान मोलमजुरीवर अवलंबून होती. मुलांना चांगले शिक्षण द्यायचे, त्यांचे उज्ज्वल भविष्य घडवायचे, हे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या रूपाली डुकरे सर्व अडचणी, संकटांवर मात करीत होत्या; परंतु नियतीने घाला घातला. चार महिन्यांपूर्वी रूपाली यांना सर्पदंश झाला. त्यामुळे त्यांना सरकारी दवाखान्यात भरती केल्या गेले. उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांची प्राणज्योत मालवल्याने लहानग्या ऋतुजा व युवराजचे मायेचे छत्र हरवले.  ही बाब चेके पाटील फाउंडेशनच्या संचालिका अर्चना संजय चेके पाटील यांना समजल्यानंतर त्यांनी या चिमुकल्यांना मायेचा आधार देण्यासाठी पुढाकार घेतला. यानुषंगाने पेठच्या सरपंच सुलोचना शेळके यांच्याशी संपर्क साधून या मुलांच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारण्याचे सांगितले. त्यानुसार अर्चना चेके पाटील यांनी पेठ येथे जाऊन या ऋतुजाची भेट घेऊन तिचे पालकत्व स्वीकारले. यावेळी सरपंच सुलोचना शेळके, द्वारकाबाई शेळके, संगीता शेळके, कमल शेळके, अलका टेंगसे, लक्ष्मी शेळके, मालता शेळके, कांता शेळके, उषा झाल्टे, आशा शेळके, स्त्रीशक्ती ग्रुपच्या मंगला सवडतकर, सारीका खबुतरे, मीना शिंदे, ऊर्मिला बावस्कर, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक इंगळे, पाटील, मेहेंद्रे, वानखेडे यांची उपस्थिती होती. 

टॅग्स :Chikhliचिखलीsocial workerसमाजसेवक