शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई: एक हजारावर विद्यार्थ्यांना होणार मुदत वाढीचा फायदा     

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 18:29 IST

आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी तिसºया लॉटरीनंतर पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घेण्याची मुदत १८ जुलैपर्यंत होती. ही मुदत आता २४ जुलैपर्यंत वाढविण्यात आली असल्याने या मुदत वाढीचा १ हजार २९० विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी फायदा होणार आहे. 

बुलडाणा: आरटीई अंतर्गत आतापर्यंत साडेतीन हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, त्यापैकी २ हजार १९० विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी तिसºया लॉटरीनंतर पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घेण्याची मुदत १८ जुलैपर्यंत होती. ही मुदत आता २४ जुलैपर्यंत वाढविण्यात आली असल्याने या मुदत वाढीचा १ हजार २९० विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी फायदा होणार आहे.  बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहयाीत शाळांमध्ये मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरीता जिल्ह्यातील २२० शाळांमध्ये २ हजार ९०८ जागांसाठी सुरू असलेल्या आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ५ हजार ३२८ आॅनलाइन अर्ज आले. त्यासाठी लॉटरी पद्धतीने अतापर्यंत तीन फेºया पूर्ण करण्यात आल्या आहेत. तिसºया फेरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांना वेळोवेळी मोबाईलवर जिल्हा परिषद शिक्षण विभागाडून माहिती पोहचविण्यात आली; मात्र प्रवेशाच्या १८ मे या अंतीम मुदतीपर्यंत जिल्ह्यातील काही पालकांनी शाळा, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे संपर्क न केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्यापही बाकीच आहेत. तिसºया लॉटरीनंतर पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घेण्याची मुदत १८ जुलैपर्यंत होती. परंतू या मुदतीपर्यंत निवड झालेल्यांपैकी जिल्ह्यातील १ हजार २९० विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया अपूर्णच असल्याचे दिसून आले. दरम्यान, ही मुदत २४ जुलैपर्यंत वाढविण्यात आल्याने तिसºया लॉटरीमध्ये निवड झालेले, परंतू प्रवेश प्रक्रिया राहिलेल्या विद्यार्थ्यांना या मुदत वाढीचा फायदा होणार आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाRight To Educationशिक्षण हक्क कायदा