शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

खामगावातील सूर्योदय पारधी आश्रमशाळेला संघाचे 'टॉनिक'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 16:06 IST

आध्यात्मिक गुरू राष्ट्रसंत स्व. भय्यूजी महाराजांनी खामगावात सुरू केलेल्या सूर्योदय पारधी आश्रम शाळेच्या मदतीला संघाचे स्वयंसेवक धावून आलेत.

- अनिल गवईखामगाव : आध्यात्मिक गुरू राष्ट्रसंत स्व. भय्यूजी महाराजांनी खामगावात सुरू केलेल्या सूर्योदय पारधी आश्रम शाळेच्या मदतीला संघाचे स्वयंसेवक धावून आलेत. संघ स्वयंसेवकांच्या मदतीतूनच यापुढे या आश्रमशाळेच्या विस्तार आणि विकास करण्यात येणार असून, आश्रमशाळेसाठी बांधण्यात आलेल्या नूतन वास्तूच्या लोकार्पणासाठी ९ सप्टेंबर रोजी सरसंघचालक मोहन भागवत यांची खामगाव येथे उपस्थिती लाभणार आहे.आध्यात्मिक गुरू स्व. भैय्युजी महाराजांच्या प्रेरणेतून खामगाव तालुक्यातील सजनपुरी येथे पारधी समाजातील मुलांसाठी आश्रमशाळा सुरू करण्यात आली आहे. या आश्रमशाळेचा गेल्या काही वर्षांपासून संघ स्वयंसेवकांकडून विस्तार आणि विकास करण्यात येत आहे. यासाठी पुणे येथील संघ स्वयंसेवक अनिरुद्ध देशपांडे यांच्या पुढाकारातून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी नूतन वसतिगृहाचे बांधकाम करण्यात आले आहे. सोबतच शाळेतील विद्यार्थ्यांना इतरही सुविधा पुरविण्यात येत आहेत. यासाठी स्व. भैय्यूजी महाराज हयात असताना एक करारपत्रही करण्यात आले.सद्यस्थितीत इमारत फळास आली असून, या इमारतीचे ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजता सरसंघचालकांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येईल. यावेळी आश्रम शाळेतील पारधी समाजातील विद्यार्थ्यांशी सरसंघचालक मोहन भागवत हितगूज देखील साधणार आहेत. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असून, सरसंघचालकांच्या स्वागतासाठी रजतनगरी सज्ज होत आहे. लोकार्पणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सरसंघचालक खामगावतील एका स्वयंसेवकाच्या घरी सायंकाळचे जेवण सुद्धा घेतील. मात्र, सरसंघचालकांच्या या नियोजित कार्यक्रमाबद्दल अतिशय गोपनीयता पाळल्या जात आहे. पारधी समाजाचा मेळावा!राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत सजनपुरी येथील सूर्योदय पारधी आश्रमशाळेत पारधी समाजाचा हितगूज मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात संघर्षातून पुढे गेलेल्या पारधी समाजातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात येईल.स्व. भैय्युजी महाराजांच्या इच्छेनुसार संघाची मदत!खामगाव येथील सजनपुरी भागातील सूर्योदय पारधी आश्रमशाळेचा विस्तार आणि विकास करण्याचा आग्रह स्व. भैय्युजी महाराजांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडे धरला होता. त्यानुसार गेल्या चार-पाच वर्षांपासून संघ स्वयंसेवकांकडून सूर्योदय पारधी आश्रमशाळेत संघाच्या स्वयंसेवकांकडून विविध विकासकामे केली जाताहेत.सजनपुरीतील आश्रमशाळा टाकणार कात!भैय्युजी महाराजांनी सुरू केलेल्या सूर्योदय पारधी आश्रम शाळेला आता संघ आणि संघ स्वयंसेवकांची मदत मिळणार आहे. थोडक्यात संघाच्या ह्यटॉनिकह्णने आश्रमशाळा कात टाकणार असून, या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसोबतच पारधी समाजाचा सर्वांगिण विकास घडवून आणल्या जाणार आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ