शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

महावितरणच्या कारवाईत ३८ लाखांची वीज चोरी उघड; बुलडाणा जिल्हय़ात ५0६ ठिकाणी कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 1:33 AM

बुलडाणा:  विजेची चोरी आणि अनधिकृत वापर करणार्‍यांविरोधात महावितरणने १८ ते २0 जानेवारीदरम्यान धडक मोहीम उघडून ५९ पथकांच्या सहकार्याने बुलडाणा जिल्हय़ात ३८ लाख ३२ हजार रुपयांची वीज चोरी उघडकीस आणली आहे. जिल्हय़ात ५0६ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली

ठळक मुद्दे ५९ पथकांनी तीन दिवस राबवली मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा:  विजेची चोरी आणि अनधिकृत वापर करणार्‍यांविरोधात महावितरणने १८ ते २0 जानेवारीदरम्यान धडक मोहीम उघडून ५९ पथकांच्या सहकार्याने बुलडाणा जिल्हय़ात ३८ लाख ३२ हजार रुपयांची वीज चोरी उघडकीस आणली आहे. जिल्हय़ात ५0६ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली असून, त्यात ४ लाख ४ हजार युनिट वीज चोरीद्वारे वापरली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधितांविरोधात पोलिसात गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या आहेत.बुलडाणा, चिखली, धाड, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, संग्रामपूर, लोणार, मोताळा, जळगाव जामोद, खामगाव,  शेगाव, मेहकर, मलकापूर व नांदुरा  या उपविभागमध्ये सध्या दर्जेदार वीज सेवा देण्यासाठी कामे सुरू आहेत. सोबतच वीजहानी, गळती व वीज चोरी कमी करण्यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्नशील आहे. वीज चोरीला अटकाव घालण्यासाठी प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत व मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांच्या निर्देशानुसार  अधीक्षक अभियंता गुलाबराव कडाळे यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंते काकाजी रामटेके, बद्रीनाथ जायभाये, पांडुरंग पवार यांच्यासह  अभियंते, अधिकारी व जनमित्र मिळून ५९ पथके या धडक मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी झाले होते. वीज मीटर मध्ये हस्तक्षेप करून थेट वीज चोरी केली जात असल्याचेही समोर आले. यामध्ये  २८७ ग्राहकांनी वीज मीटरमध्ये हस्तक्षेप करून तीन लाख ९ हजार युनिटची म्हणजे जवळपास २९ लाख ३४ हजार रुपयांची चोरी केली. १८३ जण तर थेट वीज तारेवरच हूक टाकून थेट चोरी करताना आढळून आले.  त्यांनी ८ लाख ९८ हजार रुपयांची वीज चोरी केल्याचे निष्पन्न झाले. असे जवळपास ४७0 जणांनी ४ लाख चार हजार युनिटची ३८ लाख ३२ हजार रुपयांची चोरी केली आहे. त्यांच्या विरोधात भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली. तर विजेचा गैरवापर व घेतलेल्या कारणाशिवाय दुसर्‍या कारणासाठी वीजेचा वापर करणार्‍या ३६ ग्राहकांविरोधात कलम १२६  नुसार कारवाई करण्यात आली. 

वीज चोरी व गैरप्रकाराबाबत गंभीरमहावितरण जिल्हय़ात होत असलेल्या वीज चोरी आणि गैरप्रकाराबाबत गंभीर आहे. शहरी भागात जादा प्रमाणात होणारी वीज चोरी पाहता अशी ठिकाणे निश्‍चित करून गोपनीय पद्धतीने आकस्मिक स्वरूपात कारवाई केली जाईल. वीज चोरीसाठी मीटरमध्ये तांत्रिक सुधार करून देणारे सूत्रधारही महावितरणच्या रडारवर असल्याचे बुलडाणा मंडळाचे अधीक्षक अभियंता गुलाबराव कडाळे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणbuldhanaबुलडाणा