शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल दरोडेखोर जळगाव पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 12:37 IST

Buldhana Crime News आरोपी अजय मन्साराम चव्हाण यास अकोट तालुक्यातून अटक करण्यात जळगाव जामोद पोलिसांना अखेर यश मिळाले.

ठळक मुद्देजबरी चोरी व दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस त्याच्या मागावर होते; परंतु तो मिळत नव्हता.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : जबरी चोरी व दरोडा टाकणारा आरोपी अजय मन्साराम चव्हाण यास अकोट तालुक्यातून अटक करण्यात जळगाव जामोद पोलिसांना अखेर यश मिळाले. गत एक वर्षापासून पोलीस त्याच्या शोधात होते. आरोपीच्या विरोधात जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोराळा रस्त्यावर एक वर्षापूर्वी रात्री ८ वाजता आदिनाथ पुंडलीक वाघ यांची मोटारसायकल अडवून त्यांच्याकडील २० हजार ३७० रुपये व एक मोबाइल हिसकावून संबंधित आरोपी पळून गेला. गुन्ह्यात आरोपीला शोधून काढणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते; परंतु आरोपीने नेलेल्या मोबाइलच्या लोकेशनवरून जळगाव पोलिसांनी अकोट तालुक्यातील उमरा येथून मुख्य आरोपी अजय मन्साराम चव्हाण (वय २६) यास अटक केली.आरोपीवर दर्यापूर, खल्लार, सोयगाव, मलकापूर ग्रामीण या पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरी व दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. ताे मलकापूर ग्रामीण व सोयगाव येथील गुन्ह्यामध्ये फरार आहे. बऱ्याच दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते; परंतु तो मिळत नव्हता. अखेर जळगाव जामोद पोलिसांनी त्याला जेरबंद केले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी एक पथक नेमून त्यांना निर्देश दिले होते.  पथकात सहायक पाेलीस निरीक्षक सतीश आडे, पोलीस उप-निरीक्षक भारत बर्डे, पोलिस  कॉन्स्टेबल गणेश पाटील, विकास गव्हाड व सुनील वावगे यांचा समावेश होता. त्याच्या अटकेमुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदCrime Newsगुन्हेगारी