शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीस्वारांना लुटणारा मिथून पोलिसांच्या ताब्यात, दोन आरोपी फरार

By संदीप वानखेडे | Updated: January 22, 2024 15:37 IST

डाेणगाव पाेलिसांची कारवाई

डोणगांव : पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम आंध्रृड शिवारात समृद्धी महामार्गावर असणाऱ्या लोणीगवळी रोडवरील पुलावर दुचाकीस्वारांना लुटणाऱ्या मिथून मधुकर चव्हाण नामक गुंडास गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, डोणगांव ते लोणी गवळी रोडवर समृद्धी महामार्गाच्या पुलापुढे २१ जानेवारी रोजी रात्री ८:१५ वाजेच्या सुमारास महावीर शंकर दळवी (घाटबोरी) आणि त्यांचे मित्र विनोद निवृत्ती देशमुख (आंध्रृड) हे दोघे शेतीचे साहित्य घेऊन जात असताना मिथून मधुकर (२५, रा. पांगरखेडा, जि. वाशिम) व अन्य दोघांनी महावीर दळवी यांची दुचाकी अडवून त्यांच्या व विनोद देशमुख यांच्या गळ्याला चाकू लावला. तसेच खिशातील ७०० रुपये जबरीने काढून घ्यायला लागला.

यावेळी डोणगावचे ठाणेदार अमरनाथ नागरे यांना संपर्क साधला असता, त्यांनी गस्तीवर असणारे बीट जमादार सतीश मुळे, आनंद चोपडे, पवन गाभणे, पुंडलिक वाळले यांना तत्काळ घटनास्थळी रवाना केले. त्यामुळे गावकऱ्यांच्या सहाय्याने मिथूनला पकडून डोणगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र, तोपर्यंत अन्य दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. संबंधित आरोपीवर मेहकर आणि मालेगाव (जि. वाशिम) पोलिस स्टेशनमध्ये यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याने घडवून आणलेले गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोहेकॉ संजय घिके करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी