शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

आर.ओ. घोटाळा: लेखा विभागाकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 14:51 IST

खामगाव : आर.ओ.घोटाळा प्रकरणी तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांची जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाने चौकशी केली

- योगेश फरपटलोकमत न्युज नेटवर्क  खामगाव : आर.ओ.घोटाळा प्रकरणी तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांची जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाने चौकशी केली. त्यात बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये आर.ओ. घोटाळा खरेदीमध्ये अनियमितता व घोळ झाल्याचे आढळून आल्याने ग्रामसेवकांसह गटविकास अधिकारी के.डी. शिंदे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीत अपहार करून ग्रामसेवकांनी आर.ओ.प्लांट लावल्याचे दाखवले होते. खामगाव तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या बँक खात्यातून लाखो रुपये सुद्धा कपात झाले होते. मात्र आर.ओ. प्लांट लावण्यात न आल्याने खळबळ निर्माण झाली होती. लोकमतने ही बाब उघड केल्यानंतर प्रशासकीय पातळीवर चौकशी सुरु झाली. दरम्यान जिल्हा परिषद सदस्य रेखा चंद्रशेखर महाले यांनी याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी काहीही कारवाई न केल्याने जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात त्यांनी विभागिय आयुक्तांकडे दाद मागितली. विभागीय आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. शण्मुखराजन यांना चौकशीचे निर्देश दिले. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरु झाली. त्यात १२ ग्रामपंचायतीमध्ये आर.ओ. घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले. प्रशासनाने विस्तार अधिकारी राठोड यांना प्रथमदर्शनी दोषी ठरवत निलंबनाची कारवाई केली. तब्बल चार महिन्यानंतर २८ मेरोजी संध्याकाळी ५ वाजता जिल्हा परिषदेच्या लेखा समितीने पुन्हा चौकशी करीत कागदपत्रांची पडताऴणी केली. 

१२ ग्रामसेवकांचे नोंदवले बयाणचौकशी समितीने १२ ग्रामसेवकांचे बयाण नोंदवले आहेत. त्यात प्रत्यक्ष कागदपत्रे व लेखी बयाणात तफावत आढळून येत असल्याने ग्रामसेवक दोषी असल्याचे आढळून आले आहे. अनेक ग्रामसेवकांनी थातूरमातूर आर.ओ.प्लांट लावून शासनाची फसवणूक केली. सरपंचांनी आपल्या पदाचा दुरपयोग करीत राजकीय हस्तक्षेप वाढवला. त्यामुळे कारवाईस विलंब होत आहे. 

बिडीओंवर कारवाईची टांगती तलवारतालुक्यातील १२ ग्रामपंचायतीमध्ये गैरप्रकार झाला असतांनाही गटविकास अधिकारी के. डी. शिंदे यांनी प्रकाराकडे दुर्लक्ष केले. जिल्हा परिषद सदस्यांनी तक्रार करूनही तक्रारीवर कोणतीही अ‍ॅक्शन घेतली नाही. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जेव्हा चौकशी लावली तेव्हा त्यात ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह संबधित गावाचे सरपंच दोषी आढळले आहेत. आता याप्रकरणात संबधितांवर कोणती कारवाई होते याकडे जनतेचे लक्ष लागून आहे. 

 

जिल्हा परिषद लेखा समितीने खामगाव तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांची चौकशी केली. आर.ओ. प्रकरणातील सर्व दस्तऐवज तपासले.

- सुमीत जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी, पं.स.खामगाव.

 १४ व्या वित्त आयोगाचा पैसा गावात विकास कामे करण्यासाठी उपलब्ध करून दिला जातो. मात्र तालुक्यात काही ठिकाणी निधीचा दुरुपयोग झाला. या प्रकरणाचा पाठपुरावा शेवटपर्यंत करेल. दोषींवर निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे.

- रेखा चंद्रशेखर महाले, सदस्य, जिल्हा परिषद, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव