शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहाराच्या तांदूळ वितरणाला मुहूर्त मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 11:32 IST

बुलडाणा शहरातील काही शाळा व मलकापूरसह अन्य काही ठिकाणच्या शाळेतील पोषण आहाराचा तांदूळ वितरणाला मुहूर्त मिळाला नाही.

- ब्रम्हानंद जाधव  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: लॉकडाउनमुळे शाळा बंद असल्याने शाळेतील शिल्लक असलेला पोषण आहाराचा तांदूळ व इतर धान्य विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे आदेश आहेत. जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत आतापर्यंत या आदेशाची अंमलबजावणीच झालेली नाही. बुलडाणा शहरातील काही शाळा व मलकापूरसह अन्य काही ठिकाणच्या शाळेतील पोषण आहाराचा तांदूळ वितरणाला मुहूर्त मिळाला नाही.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा, अंगणवाड्या बंद आहेत. शाळेमध्ये शिल्लक असलेले पोषण आहाराचे धान्य वितरण करण्याबाबत गेल्या महिन्याभरापूर्वीच शासनाने आदेश दिलेले आहेत. पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागातील सर्व शाळेतील पोषण आहाराचा तांदूळ, डाळी व इतर धान्य विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आले. त्याचप्रमाणे शहरी भागातील शाळेमधील तांदूळही वितरणाच्या सुचना देण्यात आल्या होत्या. ग्रामीण भागातील वितरणाचे काम पूर्ण झालेले आहे; परंतू शहरी भागातील पोषण आहाराचे धान्य वितरण करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण शहरी भागात असल्याने प्रशासनाकडूनही या भागात विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील जिल्हा परिषद, नगर पालिकेच्या शाळेतील तांदूळ वितरणास स्थानिक प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने अडचणी येत आहेत. शाळेचे मुख्याध्यापक, योजनेचे काम पाहणारे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी तांदुळ शिल्लक साठा विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटपाचे नियोजन पूर्ण केलेले आहे. परंतू आतापर्यंत बुलडाणा शहरातील काही शाळा, मलकापू शहरातील सर्वच शाळा व जिल्ह्यातील शहरी भागातही काही ठिकाणच्या शाळांमध्ये तांदूळ वाटपाची अंमलबजावणी झालेली नाही.पालकांना पोषण आहाराच्या धान्याची प्रतीक्षाशहरी भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव बघता, शहरातील कोणत्या भागामध्ये तांदुळ कधी वितरीत करावा, याबाबतचा निर्णय नगर पालिका, नगर परिषद किंवा नगर पंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांना घ्यावयाची आहे. कोणत्या भागामध्ये प्रथम प्राधान्याने तांदुळ वितरीत करावयाचा आहे, याची निश्चिती न झाल्याने मलकापूर शहरात अद्याप तांदुळ वितरणाला सुरूवात झालेली नाही. त्यामुळे पालकांना पोषण आहाराच्या धान्याची प्रतीक्षा आहे.

बुलडाण्यातील काही शाळा व मलकापूरमधील शाळांमध्ये तांदूळ वाटप झालेले नाही. अन्य ठिकाणच्या शाळेतील तांदूळ वितरणाचे काम पूर्ण झालेले आहे.- एजाज खान,शिक्षणाधिकारी बुलडाणा.

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळा