बुलडाणा : दिर्घकाल प्रलंबीत असलेल्या महसूल कर्मचार्यांच्या मागण्या मंजूर न झाल्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचार्यांनी धरणे आंदोलन करून आपल्या मागण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान मागण्या पूर्ण न झाल्यास १ ऑगस्ट पासून महसुल कर्मचार्यांनी बेमुदत संप करण्याचा निर्णय घेतला आहे. आज दुसर्या टप्यात जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन देवून महसूल संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष ङ्म्रीराम सोळंके यांच्या नेतृत्वात कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले. दरम्यान तिसर्या टप्यात येत्या १४ जुलै रोजी एक दिवस लेखणीबंद आंदोलन करण्यात येवून १ ऑगस्ट पासून राज्यभरातील महसुल कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. आज झालेल्या धरणे आंदोलनात महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय टेंभीकर, शाखा अध्यक्ष गजानन मोतेकर, नंदू यसकर, रामेश्वर जाधव, अविनाश गोसावी, विद्यानंद सावळे, रमेश गवई, रंजना झिने, डि.एन.पाटील, व्ही.जे. मोगल, डी.ए.सरकटे, एन.एम. नांदे यांच्यासह महसुल विभागातील कर्मचारी तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
महसूल कर्मचार्यांचे धरणे आंदोलन
By admin | Updated: July 10, 2014 01:34 IST