शहरं
Join us  
Trending Stories
1
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
2
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
3
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
4
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
5
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
6
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
7
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
8
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
9
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
10
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
11
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
12
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
13
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
14
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
15
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
16
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
17
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
18
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
19
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
20
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा

सायकल वारीतून प्रदुषण मुक्तीचा संकल्प - प्रल्हाद अण्णा भांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 16:13 IST

Nashik To Shegaon नाशिक-शेगाव सायकलवारीचे प्रणेते प्रल्हाद अण्णा भांड यांच्याशी साधलेला संवाद.

ठळक मुद्देसन-२००० साली नाशिक-शेगाव सायकल यात्रेला सुरूवात करण्यात आली.भक्तीतून शक्तीकडे अशी ही सायकल वारीची वाटचाल सुरू आहे.

-  अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  सायकल वारीतून भक्ती आणि शक्ती वृध्दींगत होण्यास मदत  होते. या वारीतून प्रदुषण मुक्तीचा संकल्प असून पर्यावरण रक्षणासाठीच नाशिक-शेगाव  सायकल यात्रा आयोजित केली जाते. नाशिक-शेगाव सायकलवारीचे प्रणेते प्रल्हाद अण्णा भांड यांच्याशी साधलेला संवाद.नाशिक-शेगाव सायकल यात्रेला कधीपासून सुरूवात केली?वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी पर्याय म्हणून सायकल वापरण्यास सुरूवात केली. सायकल वापरण्यामुळे आरोग्यावर चांगले परिणाम दिसायला लागले. त्यानंतर सायकल-डे ही संकल्पना राबविली. या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील तीर्थ स्थळांना भेटी देण्यास सुरूवात झाली. त्यानंतर सन-२००० साली नाशिक-शेगाव सायकल यात्रेला सुरूवात करण्यात आली.

सायकल वारीतील वाढत्या सहभागाबाबत काय सांगाल?सुरूवातीला मित्र मंडळीत सायकल वापरण्याचे महत्व पटवून दिले. आरोग्याचे महत्व पटलेले काही जण सुरूवातीला सोबत जुळले. त्यानंतर अनेकांना सायकल वापरण्याची अनुभूती आली. अनेकांची श्रध्दा वृध्दीगंत होण्यासही मदत झाली. त्यामुळे आता एक मोठी टीम तयार झाली. आता मै अकेला ही चला था जानिब-ए-मंजिल मगर लोग साथ आते गऐ और कारवॉ बनता गया असाच प्रत्यय शेगाव-नाशिक सायकल वारीत येत आहे. महाराष्ट्रातील पहिली सायकल वारी सुरू केल्याचे समाधानही आहे.

सायकल वारीच्या आजपर्यंतच्या उपलब्धी बाबत काय सांगाल?आजच्या धकाधकीच्या जीवनात   पंढरपूर-आळंदी-शेगाव पायदळ वारी करणे प्रत्येकाला शक्य नाही. त्यामुळे अध्यात्मातून विज्ञानाकडे भक्तीतून शक्तीकडे अशी ही सायकल वारीची वाटचाल सुरू आहे. या वारीत अनेक जण दिवसेंदिवस जुळत आहेत. वारीत अनेकांचा सहभाग वाढत आहे. नाशिक-शेगावपर्यंत अनेकांशी ऋणानुबंध वृध्दीगंत होत आहे. ही मोठी उपलब्धी या सायकल वारीची आहे.

 नाशिक-शेगाव सायकलवारीतून समाजाला संदेश काय?विदर्भ पंढरीनाथ श्री गजानन महाराजांनी आपल्या चमत्कारातून अन्न वाया न जाऊ देण्याचा मंत्र दिला आहे. महाराजांनी जीवदयेचाही मंत्र दिला आहे. या मंत्राचा प्रत्येकाने अंगिकार करावा. पर्यावरण रक्षणाची कास धरावी. थोडक्यात, सर्व धर्मांची एकच शिकवण, पर्यावरणाचे करा रक्षण, हाच संदेश आपला या सायकलवारी द्वारे  प्रामुख्याने युवक वर्गांसह संपूर्ण समाज बांधवांना राहणार आहे.

टॅग्स :khamgaonखामगावNashikनाशिकShegaonशेगाव