शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जलाशये कोरडी; ग्रामीण भागात पाणीबाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 15:35 IST

खामगाव : सध्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात ज्या धरणांवर पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत; अशी सर्व धरणे कोरडी पडल्याने पाणी उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे.

खामगाव : सध्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात ज्या धरणांवर पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत; अशी सर्व धरणे कोरडी पडल्याने पाणी उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे गावा-गावात पाण्यासाठी महिलांसह नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. प्रशासनाकडून टँकरद्वारे तसेच विहिरी अधिग्रहित करून पाण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र अधिग्रहित केलेल्या विहिरीही आटत आहेत. उपलब्ध करून देण्यात येत असलेले पाणी कमी पडत आहेत. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. ग्रामीण भागाप्रमाणेच शहरांचीही तीच अवस्था आहे. अशा अवस्थेत अनेक सामाजिक संघटनांकडून टँकरने मोफत पाणी वाटप करण्यात येत असून काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळत आहे.जवळच असलेल्या दुर्गादैत्य येथे पाण्यावाचून नागरिकांचे हाल होत आहेत. येथील मुख्य पाण्याचे स्त्रोत असलेल्या विहिरी, बोरवेल, हातपंप आटले असून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.वानखेडसह दुर्गादैत्य परिसरात पाणी पातळी प्रचंड खालावली आहे. यामुळे या परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. स्थानिक ग्राम पंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे दुर्गादैत्य वासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विशेष करून महिलांचे अतिशय हाल होत आहेत.गावात लाखो रुपये खर्च करुन आणलेली महाजल योजना कुचकामी ठरली असल्याचे दिसून येत आहे. १४० गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत असले, तरी पाईपलाईन अभावी हे काम रखडले आहे. सध्या गावाच्या मुख्य रस्त्यावरुन वानखेडकडे जाणाऱ्या पाईपलाईनच्या लिकेजद्वारे निघणाºया पाण्यावर नागरिक आपली तहान भागवत आहेत. आणखी १ महिना नागरिकांना काढावा लागणार आहे. त्यामुळे पाणी समस्या निकाली काढण्याची गरज आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावwater scarcityपाणी टंचाई