शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

'धर्म हा उन्नतीचा मार्ग असून जोडणे हेच धर्माचे कार्य' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 20:41 IST

सूर्योदय पारधी आश्रम शाळा:  शैक्षणिक संकुलातील वसतीगृहाचे थाटात उद्घाटन

खामगाव: आपण तरूण इतरांना तारणे हेच खऱ्या संतांचे लक्षण आहे. भय्यूजी महाराजांनी वंचितांच्या सेवेसाठी आपले जीवन खर्ची घातले.  सजनपुरी येथे सेवेचे तीर्थक्षेत्र निर्माण केले. या तीर्थक्षेत्रात अनेकजण स्नान करून पवित्र होताहेत. ‘सेवा’ कर्तव्य नसून अनिवार्य कार्य आहे, असे नि:संदिग्ध प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले.

खामगाव तालुक्यातील सजनपुरी येथे शुक्रवारी श्री सदगुरू दत्त धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्ट इंदौरच्यावतीने शैक्षणिक संकुलातील वसतीगृहाच्या उद्घाटन प्रंसगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी  प्रमुख अतिथी म्हणून अमनोरा एस्स फांऊडेशनचे अध्यक्ष अनिरूध्द देशमुख, विदर्भ प्रातांचे सह संघचालक चंद्रशेखर राठी, भय्यूजी महाराजांच्या धर्मपत्नी डॉ. आयुषी देशमुख, प्रशांत देशमुख, माधुरी देशमुख यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, धर्म हा उन्नत करणारा असून, धर्माचे काम जोडण्याचे आहे. सेवेच्या माध्यमातून सेवा करणारा पवित्र होतो. खरी सेवा ही अंहकारमुक्त सेवा असून, सजनपुरी येथील सूर्योदय पारधी आश्रम शाळेत पवित्र सेवाकार्य सुरू आहे. वंचिताच्या या सेवाकार्यासाठी समाजाने संवेदनशील होवून पुढे आलं पाहीजे. या सेवाकार्यात जमत नसेल तर, जसे जमेल तशी सेवा केली पाहीजे. भय्यूजींच्या प्रेरणा आणि आशिवार्दाने सुरू असलेल्या या कार्याच्या दर्शनासाठी आपण येथे आलो असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.

यावेळी खामगाव मतदार संघाचे आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर, जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉ. संजय कुटे, मलकापूर मतदार संघाचे आ. चैनसुख संचेती, खामगावच्या नगराध्यक्षा अनिता डवरे, भाजप जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, माजी आमदार विजयराज शिंदे, सागर फुंडकर, ह.भ.प लक्ष्मीनारायण दायमा महाराज, प.पू. दिडेमामा, प्रकाश देशमुख, सतीश राठी, विजय देशपांडे, महादेवराव भोजने आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक अनिरूध्द देशपांडे यांनी केले. यावेळी माधुरी देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी सरसंघचालकांच्या हस्ते संदीप बावडेकर, योगेश साधवानी, अभिजीत कुंटे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन विवेक कुलकर्णी यांनी केले. आभार मुख्याध्यापक सोमनाथ गोरे यांनी मानले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतbuldhanaबुलडाणा