शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने पिकांना दिलासा; सिंचन प्रकल्पांमधील जलसाठाही वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 18:08 IST

खामगाव :  मोठ्या विश्रांतीनंतर पावसाने केलेल्या दमदार आगमनाने पिकांना दिलासा मिळाला आहे. घाटाखालील सहा तालुक्यातील सिंचन प्रकल्पांमधिल पाण्याच्या पातळीतही यामुळे वाढ झाली आहे.

- देवेंद्र ठाकरे

खामगाव :  मोठ्या विश्रांतीनंतर पावसाने केलेल्या दमदार आगमनाने पिकांना दिलासा मिळाला आहे. घाटाखालील सहा तालुक्यातील सिंचन प्रकल्पांमधिल पाण्याच्या पातळीतही यामुळे वाढ झाली आहे.

गेले काही दिवस पावसाने घेतलेली विश्रांती शेतकºयांसाठी चिंतेचा विषय ठरत होती. यामुळे हजारो हेक्टरवरील पिके सुकण्याच्या मार्गावर होती. पावसाने मारलेल्या दडीने दुष्काळाचे सावट पसरले होते. बराच काळ पावसाने खंड दिल्याने  पेरणीनंतरची पिकांची आंतरमशागतीची कामेही आटोपली होती. त्यामुळे सर्वच जण पावसाची प्रतीक्षा करीत होते. आधीच तब्बल महिनाभर उशीराने पेरण्या झाल्याने पावसाची नितांत गरज होती. अशातच पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकºयांची चिंता वाढली होती.  यावर्षी १०० टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता, त्यामुळे सुरूवातीला शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण होते.  मात्र जुलैच्या पहिल्याच आठवड्यात हा अंदाज फेल ठरला. पावसाने उघडीप दिल्याने उडीद, मुगाची पिके धोक्यात आली. अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर १६ आॅगष्ट पासून खामगावसह सहाही जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली. यामुळे पिकांना जिवदान मिळाले. नागरिकांची तहान भागविणाºया  लघु तसेच मध्यम सिंचन प्रकल्पांमध्येही जलसाठा वाढला असून दुष्काळाचे सावट काहीसे कमी झाले आहे. खामगाव तालुक्यात ज्ञानगंगा, तोरणा, मन, मस, जळगाव जामोद तालुक्यातील गोडाळा, धानोरा, राजुरा, नांदुरा तालुक्यातील कंडारी, मलकापूर तालुक्यातील चिखली रणथम यासह इतरही सिंचन प्रकल्पांमधील जलपातळी साधारणपणे २ टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे पिण्याचा प्रश्न सुटण्यास काही अंशी मदत होणार आहे.

 

 चाऱ्याचा प्रश्न मिटणार!

गेल्या तिन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे  काही ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आले. अनेक भागातील नदी-नाले मात्र अद्याप कोरडेच आहेत. जनावरांचा चाºयाचा प्रश्न काही प्रमाणात यामुळे सुटल्याचे दिसून येत आहे. अजुनही जोरदार पाऊस आवश्यक असला, तरी सध्या रानात भरपूर चारा उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. पिकेही आनंदाने डोलत असल्यामुळे भविष्यातील चाºयाचा प्रश्न सुध्दा सुटणार आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेतीFarmerशेतकरी