शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलमध्येच होणार ‘शेतकरी सन्मान’ योजनेची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 12:00 IST

PM Kisan Scheme : प्रत्येक तहसीलदाराला लॉगीन आयडी देण्यात येणार असून, आता तहसील कार्यालयामध्येच या योजनेत सहभागी होण्याकरिता नोंदणी करता येणार आहे.  

- विवेक चांदूरकर   खामगाव : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमध्ये काही भागात गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर केंद्र सरकारने नवीन नोंदणी काही कालावधीसाठी बंद केली आहे. दरम्यान प्रत्येक तहसीलदाराला लॉगीन आयडी देण्यात येणार असून, आता तहसील कार्यालयामध्येच या योजनेत सहभागी होण्याकरिता नोंदणी करता येणार आहे.    केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी फेब्रुवारी २०१९ पासून पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरू केली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून सहा हजार रुपये देण्यात येतात. वर्षातून तीन वेळा दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात. आतापर्यंत आठ वेळा शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यात जवळपास ३.७५ लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेमध्ये खासगी ऑनलाईन सेंटरवरून नोंदणी करण्यात येत होती. एकाच सातबाऱ्यावर नाव असलेले चार ते पाच शेतकरी, तसेच अन्य उत्पन्नाचा स्रोत असलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळत आहे. त्यामुळे हा प्रकार बंद करण्याकरिता शासनाने काही काही कालावधीसाठी नवीन नोंदणी बंद केली आहे. तसेच येत्या काळात प्रत्येक तहसीलदाराला आयडी देण्यात येणार असून, तहसील कार्यालयात नव्याने नोंदणी करण्यात येणार आहे. शासनाच्यावतीने सध्या ज्या शेतकऱ्यांकडे अन्य उत्पन्नाचे साधन आहे, अशा शेतकऱ्यांचा सध्या शोध घेण्यात येत आहे.   नव्याने नोंदणी बंद असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी शेती खरेदी केली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील हिस्सेवाटणी झाली त्यांच्या नावावर शेती करण्यात आली. हे शेतकरी पंतप्रधान सन्मान योजनेसाठी नोंदणी करीत आहे. मात्र, नोंदणी दोन महिन्यांपासून बंद आहे. जून महिन्यामध्ये या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आठवा हप्ता मिळाला. नोंदणी करणाऱ्यां शेतकऱ्यांची नोंदणी झाली असती तर त्यांना या योजनेचा लाभ मिळाला असता. मात्र, नोंदणी बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात शेतकरी सन्मान योजनेसाठी कधी नोंदणी सुरू होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहले आहे.

मी गत दोन महिन्यांपासून पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत नाव नोंदणीसाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, नोंदणी होत नाही. जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांना आठवा हप्ता मिळाला. माझी नोंदणी झाली असती तर मला त्याचा लाभ झाला असता. - गजानन डंबेलकर, शेतकरी

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाkhamgaonखामगावFarmerशेतकरी