शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरण कंपनीत कर्मचार्‍यांची कमी; कामाचा खोळंबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:21 IST

मेहकर : मेहकर उपविभाग वीज वितरण कंपनीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. समस्या वेळेवर सुटत नसल्याने सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे; परंतु मेहकर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये विविध विभागात अनेक कर्मचार्‍यांच्या जागा रिक्त आहेत.

ठळक मुद्दे१४३ गावांचा कारभार केवळ ४९ कर्मचार्‍यांवर एक वर्षापासून शाखा अभियंताच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : मेहकर उपविभाग वीज वितरण कंपनीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. समस्या वेळेवर सुटत नसल्याने सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे; परंतु मेहकर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये विविध विभागात अनेक कर्मचार्‍यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे इतर कर्मचार्‍यांवर कामाचा बोजा वाढत आहे. मेहकर तालुक्यात येणार्‍या जवळपास १४३ गावांचा कारभार केवळ ४९ कर्मचार्‍यांवर चालतो. कर्मचारी कमी असल्याने समस्या वाढत असून, इतर कर्मचार्‍यांवर कामाचा ताणतणाव वाढत आहे.सध्या दैनंदिन जीवनामध्ये इतर जीवनावश्यक वस्तुबरोबर वीज ही आवश्यक बाब होऊन बसली आहे. घरगुती कामापासून ते व्यवसाय, शेती इतर कामासाठी वीज ही आवश्यक होऊन बसली आहे. शेतकर्‍यांच्या कृषी पंपाची कामे वेळेवर होत नसल्याने याचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर होत आहे. कृषी पंपाची वीज वेळेवर मिळत नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही, त्यामुळे पिकांच्या उत्पादनात दिवसेंदिवस घट होत चालली आहे. दरम्यान, वीज वितरण कंपनी कार्यालय मेहकर अंतर्गत जवळपास ९३ पदे मंजूर आहेत; परंतु प्रत्यक्षात मात्र केवळ ४९ कर्मचारीच कार्यरत आहेत. ४४ कर्मचार्‍यांची पदे रिक्त असल्याने अन्य कर्मचार्‍यांवर कामाचा बोजा वाढत आहेत. काम जास्त अन् कर्मचारी कमी. त्यामुळे शेतकर्‍यांची व सर्वसामान्यांची विजेची कामे वेळेवर होत नाहीत. जनतेमध्ये वीज कंपनी विरोधात रोष निर्माण होताना दिसत असला तरी पण वरिष्ठ पातळीवरून रिक्त जागा भरण्यास विलंब होत असल्याने विजेच्या समस्या निर्माण होत आहेत. कर्मचारी कमी असूनही इतर जे कार्यरत कर्मचारी आहेत, ते कर्मचारी आपल्या परीने वीज समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मेहकर भाग १ मध्ये ११ जागा मंजूर असून, ५ कर्मचारी कार्यरत आहेत. ६ कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहेत. मेहकर भाग - २ मध्ये १३ जागा मंजूर असून, ९ कर्मचारी कार्यरत आहेत, तर ४ जागा रिक्त आहेत. मेहकर ग्रामीण भाग १ मध्ये १३ जागा मंजूर असून, ११ कार्यरत तर २ जागा रिक्त आहेत. मेहकर ग्रामीण भाग २ मध्ये ११ जागा मंजूर असून, ४ कर्मचारी कार्यरत आहेत. ७ जागा रिक्त आहेत. डोणगाव भाग १ मध्ये १४ जागा मंजूर असून, ७ कर्मचारी कार्यरत असून, ७ जागा रिक्त आहेत. डोणगाव भाग २ मध्ये १२ जागा मंजूर असून, ७ कर्मचारी कार्यरत आहेत. ५ जागा रिक्त आहेत. जानेफळ येथे १६ जागा मंजूर असून, ६ कर्मचारी कार्यरत तर १0 जागा रिक्त आहेत. यामध्ये जवळपास ९0 जागा मंजूर असताना प्रत्यक्षात मात्र केवळ ४९ कर्मचारी कार्यरत आहेत. ४१ कर्मचारी सध्या रिक्त आहेत. त्यामुळे इतर कर्मचार्‍यांवर कामाचा बोजा वाढत असून, विजेच्या समस्या सुटण्यास विलंब होत आहे. त्यामुळे रिक्त असलेल्या जागा तत्काळ भरुन समस्या सोडवाव्यात, अशी मागणी होत आहे.   

एक वर्षापासून शाखा अभियंताच नाहीमेहकर येथील वीज कंपनी कार्यालयामध्ये गेल्या १ वर्षापासून २ शाखा अभियंत्याची पदे रिक्त आहेत. तर अकाऊंट असिस्टंटची १ जागा गेल्या ३ वर्षापासून रिक्त आहे. या रिक्त जागांमुळे कार्यालयातील कामाचा खोळंबा होत आहे. 

टॅग्स :Power Shutdownभारनियमन