शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीचे मेसेज प्राप्त; पण बँकांना आदेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 16:45 IST

शेतकरी बँकेत कर्जाच्या प्रतीक्षेत सिंदखेडराजा : तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे मेसेज मोबाईलवर प्राप्त होऊनही त्यांची कर्जमाफी न झाल्याने शेकडो शेतकºयांचे कर्ज प्रकरण बँकेत पडून आहे. बँकांना ज्या शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली त्यांनाच कर्ज पुरवठा होत असल्याने शेकडो शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीक कर्जाबाबतचे शासनाचे निश्चित धोरण काय? याबाबत ...

ठळक मुद्देकर्जदार शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचे मेसेज प्राप्त झाले तर काहींना आजही कर्जमाफीचे मेसेज प्राप्त झाले नाही.राताळी, गोरेगाव, साखरखेर्डा, उमनगाव येथील शेतकऱ्यांचे कर्ज पुनर्गठणच्या नावाखाली मागील वर्षी व्याजासह भरून घेण्यात आले.

शेतकरी बँकेत कर्जाच्या प्रतीक्षेत सिंदखेडराजा : तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे मेसेज मोबाईलवर प्राप्त होऊनही त्यांची कर्जमाफी न झाल्याने शेकडो शेतकºयांचे कर्ज प्रकरण बँकेत पडून आहे. बँकांना ज्या शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली त्यांनाच कर्ज पुरवठा होत असल्याने शेकडो शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीक कर्जाबाबतचे शासनाचे निश्चित धोरण काय? याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. महाराष्ट्र शासनाने अल्पभूधारक आणि १ लाख ५० हजार रुपयांची कर्जमाफी केली होती. थकीत कर्जदार शेतकऱ्यांनी आॅनलाइन अर्जही भरले. थकीत कर्जदार शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचे मेसेज प्राप्त झाले तर काहींना आजही कर्जमाफीचे मेसेज प्राप्त झाले नाही. बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे थकीत कर्जदार गजानन टाले यांनी २०११ मध्ये पीक कर्ज घेतले होते. तेव्हापासून ते थकित होते त्यांनी पिक कर्ज माफीचा अर्ज आॅनलाइन भरला होता. त्यांना कर्जमाफी झाल्याचा मेसेज प्राप्त झाला. त्यांनी पीक कर्जासाठी बँकेत अर्ज दाखल केला. परंतु गजानन टाले यांना बँकेचे शाखा व्यवस्थापक चव्हाण यांनी सांगितले की, तुम्हाला आलेला मेसेज हा चुकीचा असून तुमची शासनाने कर्जमाफी केली नाही. त्याबाबत बँकेला कोणतीही यादी प्राप्त झाली नाही. असेच प्रकार अनेक शेतकऱ्यांसोबत होत आहेत. जिल्हा को.आॅप. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी २०१७ मध्ये मोहाडी, शिंदी, राताळी, गोरेगाव, साखरखेर्डा, उमनगाव येथील शेतकऱ्यांचे कर्ज पुनर्गठणच्या नावाखाली मागील वर्षी व्याजासह भरून घेण्यात आले. त्यांना कागदोपत्री नवीन कर्ज वाटप झाल्याचे दाखविण्यात आले. त्या शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. महाराष्ट्र शासनाने सरसकट कर्जमाफीची घोषणा करूनही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. स्टेट बँकेत काही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी लावली असून त्या शेतकºयांना कर्ज पुरवठा होत असला तरी काही तांत्रिक बाबी बँक कर्मचाºयांच्या लक्षात येत नसल्याने त्या शेतकऱ्यांचा कर्जपुरवठा थांबविला आहे. त्यामुळे येथील शेतकरी अडचणीत सापडला आहे. कर्ज हवे असल्यास वारसदारांचे ना-हरकत आणा स्टेट बँकेतून कर्ज हवे असेल तर सात-बारावर जेवढ्या वारसदारांची नावे असतील त्या वारसदारांचे १०० रुपयांच्या बाँडपेपरवर नाहरकत नोटरी करून आणा, असा आदेशच बँकेने काढला असून अनेक शेतकºयांना तहसील कार्यालयात जाऊन नोटरी करून आणावी लागत आहे. त्यामुळे आर्थिक भार शेतकºयांना सोसावा लागत आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाSindkhed Rajaसिंदखेड राजाFarmerशेतकरीbankबँक