शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श उपक्रम : जेवढी वाचाल पुस्तके, तेवढे मिळणार बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 17:42 IST

बुलडाणा: वर्ग पाचवी ते नववी मध्ये शिक्षण घेत असलेल्या बुलडाणा शहरातील विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुट्टीत  १४ एप्रिल ते १५ जून अशा दोन महिन्याच्या कालावधीत जी मुलं जेवढी गोष्टींची पुस्तके वाचतील तेवढ्या रुपयांचे त्यांना पुस्तक मैत्री बालवाचनालयाकडून बक्षीस देण्यात येणार आहे.

बुलडाणा: वर्ग पाचवी ते नववी मध्ये शिक्षण घेत असलेल्या बुलडाणा शहरातील विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुट्टीत  १४ एप्रिल ते १५ जून अशा दोन महिन्याच्या कालावधीत जी मुलं जेवढी गोष्टींची पुस्तके वाचतील तेवढ्या रुपयांचे त्यांना पुस्तक मैत्री बालवाचनालयाकडून बक्षीस देण्यात येणार आहे. वाचन संस्कृती टिकविण्यासाठी वाचनालयाचा हा उपक्रम सर्वांसाठी आदर्श ठरत आहे. मोबाईल व संगणकच्या युगात वाचन संस्कुतीपासून मुले दुरावली आहेत. त्यामुळे वाचन संस्कृती जपण्याच्या उद्देशाने बुलडाण्यातील वाचनालयाकडून विशेष अभियान हाती घेण्यात आले आहे. आजपाचवी ते नववी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुट्टीतील दोन महिन्याच्या कालावधीत  जी मुलं जेवढी गोष्टींची पुस्तके वाचतील तेवढ्या रुपयांचे त्यांना पुस्तक मैत्री बालवाचनालयाकडून बक्षीस जाहीर करण्यात येणार आहे. साठ दिवसात १२० पेक्षा जास्त पुस्तके गोष्टींची मुले वाचू शकतात. बाल-कुमार मुलांमध्ये वाचन संस्कृतीची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम प्रगती सार्वजनिक वाचनालय व पुस्तकमैत्री बालवाचनालय च्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. या ऊन्हाळी वाचन अभियानासाठी फक्त शंभर विद्यार्थ्यांची  निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दर रविवारी महाराष्ट्रातील मान्यवर साहित्यिक, कवी, लेखक स्वत: कविता कशी लिहावी, गोष्ट कशी लिहावी, अभिनय कसा करावा, कोणती पुस्तके वाचली पाहिजेत याबाबत दोन महिन्यात आठ वेळा तज्ञ मान्यवर मोफत मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत. मुलांना वाचनाची विशेष आवड लावण्यासाठी पालकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुलांमध्ये वाचन-लेखनाची अभिरूची वाढविणारे साहित्यिक नरेद्र लांजेवार यांनी केले आहे. त्यासाठी प्रगती सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल पंजाबराव गायकवाड व नरेंद्र लांजेवार यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन  प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षा अरूणा कुल्ली, आणि पुस्तक मैत्री बालवाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे. सहभागी विद्यार्थ्याला मिळणार प्रमाणपत्रया वाचन अभियानात सहभागी होणाºया प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र सुद्धा मिळणार आहे. प्रगती वाचनालयाच्या सहकाºयाने अनेक चांगली पुस्तके या मुलांना रोज सकाळी आठ ते दहा व संध्याकाळी ५ ते ७ या वेळात मिळू शकतील. मुले  प्रगती वाचनालयात बसून पुस्तके वाचू शकतील किंवा घरीसुद्धा घेऊन जाऊ शकतील. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाSummer Specialसमर स्पेशल