शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

काळा बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पकडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:19 IST

धाड :  काळा बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने जाणार्‍या रेशनचा तांदूळ पकडल्याची कारवाई धाड पोलिसांनी  २९ ऑक्टोबरच्या दुपारी २ वाजता धाड पोलीस स्टेशन हद्दीत येणार्‍या वरुड रंगाप्पा येथील बसथांब्यावर केली. यावेळी आरोपींच्या ताब्यातून ४0 हजार रुपयांच्या रेशनच्या तांदळासह २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ठोणदार संग्राम पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देधाड पोलिसांची कारवाई ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त 

लोकमत न्यूज नेटवर्कधाड :  काळा बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने जाणार्‍या रेशनचा तांदूळ पकडल्याची कारवाई धाड पोलिसांनी  २९ ऑक्टोबरच्या दुपारी २ वाजता धाड पोलीस स्टेशन हद्दीत येणार्‍या वरुड रंगाप्पा येथील बसथांब्यावर केली. यावेळी आरोपींच्या ताब्यातून ४0 हजार रुपयांच्या रेशनच्या तांदळासह २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ठोणदार संग्राम पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.बुलडाणा जिल्ह्याच्या नव्हे, तर विदर्भाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या धाड पोलीस स्टेशन हद्दीतील काही गावे बेकायदा व्यवसायांसाठी प्रसिद्ध आहेत.  दरम्यान, शिवना जि. औरंगाबाद येथील दोन रेशन माफिया धाड परिसरातील काही रेशन दुकानदारांकडून खरेदी केलेला गरिबांच्या हक्काचा तांदूळ धावडा जि. जालना येथे घेऊन जात असल्याची गुप्त माहिती पोलीस नाईक प्रकाश दराडे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणेदार संग्राम पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक रोकडे, पोलीस हवालदार सावळे, पोलीस नाईक प्रकाश दराडे, खंडागळे, शितोड व गजानन मोरे यांनी २९ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता वरुड रंगाप्पा ता. बुलडाणा येथे सापळा रचला. यावेळी आपल्या ताब्यातील दुचाकीवरून आरोपी शेख मुजफ्फर शेख फय्युम (वय १९ वर्षे) व आफताब मोहमद उस्मान कुरेशी (वय ३0 वर्षे) दोघे रा. शिवना जि. औरंगाबाद हे रेशनचा १ क्विंटल तांदूळ घेऊन जाताना रंगेहात मिळून आले. यावेळी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसुन चौकशी केली असता, त्यांनी शिवना येथील रहिवाशी असल्याचे सांगत सदर तांदूळ धावडा येथे असलेल्या गोडाउनमध्ये घेऊन जात असल्याची कबुली पोलिसांना दिली. यावेळी पोलिसांनी धावडा येथील गोडाउनवर छापा मारुन पुन्हा १९ क्विंटल रेशनचा तांदूळ किंमत ४0 हजार रुपये, असा एकूण ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कलम ३/१८१/१५८/७७ जीवनावश्यक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आली. दरम्यान, उपरोक्त आरोपींना ३0 ऑक्टोबर रोजी बुलडाणा येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

टॅग्स :Crimeगुन्हा