शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

शिधापत्रिकाधारकांना मिळेल आता कोणत्याही दुकानातून धान्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:40 IST

बुलडाणा : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत आता बुलडाणा जिल्ह्यातील एक हजार ५३८ रास्त भाव दुकानामध्ये एईपीडीएस प्रणाली (आधार अ‍ॅनेबल पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टीम) महाराष्ट्र दिनापासून कार्यान्वित होत आहे. शिधापत्रिकाधारकांना पोर्टेबिलिटीचा अधिकार मिळाल्यामुळे महिन्यातून कोणत्याही दुकानातून एकदा त्यांना धान्य घेणे सोपे झाले आहे.

ठळक मुद्दे‘ईपीडीएस’ प्रणालीची महाराष्ट्र दिनापासून अंमलबजावणी

बुलडाणा : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत आता बुलडाणा जिल्ह्यातील एक हजार ५३८ रास्त भाव दुकानामध्ये एईपीडीएस प्रणाली (आधार अ‍ॅनेबल पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टीम) महाराष्ट्र दिनापासून कार्यान्वित होत आहे. शिधापत्रिकाधारकांना पोर्टेबिलिटीचा अधिकार मिळाल्यामुळे महिन्यातून कोणत्याही दुकानातून एकदा त्यांना धान्य घेणे सोपे झाले आहे.दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांच्या आधारकार्डचा डाटा ९४ टक्के संगणकीकृत झाल्याने बुलडाणा जिल्ह्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी, मध्यंतरी धान्य घोटाळ्यामुळे चर्चेत आलेल्या पुरवठा विभागाच्या कारभारात अधिक पारदर्शकता येण्यास मदत होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले. बुलडाणा जिल्ह्यातील दीड हजार रेशन दुकानांमध्ये यापूर्वीच ई-पॉस मशीन बसविण्यात आलेले आहेत; मात्र प्रसंगी हाताचे ठसे मॅच न झाल्यास माणूस प्रत्यक्ष ओळखीचा असल्याने त्याला रेशन दुकानदारही धान्य देत होते; मात्र आता ई-पॉस मशीनवर हाताचे ठसे प्रत्यक्षात जुळल्याशिवाय शिधापत्रिकाधारकाला धान्य उपलब्ध होणार नाही. त्यानुषंगाने एईपीडीएस ही प्रणाली महत्त्वपूर्ण आहे. कोल्हापूरसह अन्य काही जिल्ह्यांत याची अंमलबजावणी यापूर्वीच सुरू झाली आहे. आता बुलडाणा जिल्ह्यात ती लागू होत आहे. यामध्ये जिल्ह्यातील ४ लाख ४७ हजार १४० पात्र शिधापत्रिकाधारकांना अंगठ्याच्या ठशाची ओळख पटवून बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरण केले जाणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात अंत्योदय योजनेंतर्गत ६८ हजार १४७ कुटुंब, प्राधान्य कुटुंब योजनेतील तीन लाख तीन हजार २९० कुटुंब, शेतकरी योजनेतील ७५ हजार ७०३ कुटुंबांचा समावेश आहे. दरम्यान, यापैकी ज्या लाभार्थीचे आधार सिडिंग शिधापत्रिकेसोबत करण्यात आले आहे, त्यांनाच धान्य वाटप करण्यात येईल. 

९८ हजार मेट्रिक टन गव्हाचे वाटप!जिल्ह्यात एकूण ९७ हजार ७०० मेट्रिक टन गहू आणि २२ हजार ७६० मेट्रिक टन तांदूळ असे एकूण एक लाख २० हजार ४६० मेट्रिक टन अन्नधान्य, ६६४ क्विंटल साखर स्वस्त दराने ई-पॉस मशीनद्वारे वाटप करण्यात येत आहे. सोबतच चार हजार ६५४ क्विंटल तूर डाळीचे वाटपही शिधापत्रिकेवर होत आहे.

तीन हजार मेट्रिक टन साठवण क्षमता वाढली!बुलडाणा जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या देऊळगावराजा, लोणार आणि चिखली येथील एक हजार ८० मेट्रिक टन साठवण क्षमतेचे गोदामही पूर्णत्वास गेले आहे. त्यामुळे जिल्ह्याची धान्य साठवण क्षमता वाढली असून, पुरवठा विभागाची साठवण क्षमता वाढली आहे. जिल्ह्याची एकूण धान्य साठवण क्षमता आता तीन लाख ७७ हजार ४९९ मेट्रिक टनाच्या आसपास आहे.

धान्य दुकानदारांचा फायदापुरवठा विभागाने ९४ टक्के डाटा संगणकीकृत केल्याने एईपीडीएस प्रणाली कार्यान्वित झाली आहे. त्याचा फायदाही धान्य दुकानदारांना होणार आहे. शिधापत्रिकाधारक या प्रणालीमुळे कोणत्याही दुकानातून एकदा धान्य घेऊ शकतो. त्यामुळे स्वच्छ, पारदर्शी कारभार आणि सेवा देण्याची तत्परता याच्या निकषावर शिधापत्रिकाधारक चांगल्या दुकानाची निवड करू शकतो. त्यामुळे प्रतिक्विंटल दीडशे रुपये मार्जिन मिळणाºया दुकानदाराला याचा अधिक फायदा होण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा