शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दहीद बुद्रूक मध्ये आढळले दुर्मिळ खवल्या मांजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 16:06 IST

दुर्मिळ खवल्या मांजर समोर आले तेव्हा त्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी व लहान मुलांनी येथे गर्दी केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या नऊ टक्के वनसंपदा असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील जैवविविधता समृद्ध असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. बुलडाणा शहरापासून अवघ्या दहा ते १२ किमी अंतरावर असलेल्या दहीद बुद्रूक गावात रात्री दुर्मिळ खवल्या मांजर आढळून आल्याने या जैविविधतेवर एक प्रकारे शिक्का मोर्तबच झाले आहे.दहीद बुद्रूक गावात शुक्रवारी  रात्री आठ वाजेच्या सुमारास एक विचित्र दिसणारा प्राणी आल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहले. त्यामुळे काही नागरिकही भयभीत झाले होते. मात्र नतंर हा प्राणी दुसरा तिसरा कोणी नसून दुर्मिळ झालेले खवल्या मांजर असल्याचे स्पष्ट झाले. दहीद बुद्रूक येथील मुख्य शाळेच्या समोरच असलेल्या झाडीतून हे दुर्मिळ खवल्या मांजर समोर आले तेव्हा त्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी व लहान मुलांनी येथे गर्दी केली होती.दरम्यान, हे खवल्या मांजर दुर्मिळ असून त्याचे महत्त्व लक्षात येताच गावातील देवकर नामक व्यक्तीने त्वरित बुलडाणा वनविभागाला याची माहिती दिली. दुर्मिळ सस्तन प्राणी आणि तोही शेड्यूल वनमधील असल्यामुळे वनविभागाने त्वरित हालचाल केली व बुलडाणा वनविभागाची एक रेस्क्यू टीम दहीद बुद्रूक गावात शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पाठवली. रेस्क्यू टिमचे सदस्य असलेले संदीप मडावी आणि समाधान मान्टे यांनी गावातील मुख्य शाळेच्या परिसरात असलेले हे खवल्या मांजर ग्रामस्थांच्या मदतीने पकडले व त्याला बुलडाणा येथील जिल्हा उपवनसंरक्षक कार्यालयात रात्री दहाच्या सुमारास आणण्यात आले. तेथे त्याची तपासणी करण्यात आल्यानंतर त्यास जिल्हा उपवनसंरक्षक संजय माळी यांच्या निर्देशानुसार अस्वलांसाठी प्रसिद्ध असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात रात्रीच सोडण्यात आले. खवल्या मांजर हे एक दुर्मिळ प्रजातीमधील प्राणी आहे. बुलडाणा जिल्ह्यातही प्रदीर्घ कालावधींतर हे खवल्या मांजर आढळून आले आहे. १९७२ च्या वन्य जीव अधिनियमानुसार या प्राण्याला संरक्षण देण्यात आले आहे. मुंग्या व उधई  त्याचे प्रमुख अन्न असून लांब जिभेद्वारे ते तो खातो.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwildlifeवन्यजीव