लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमात पडल्यावर लग्नाचे आमिष दाखवून अकोल्यातील युवतीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या येथील उपअभियंत्यासह तिघांविरुद्ध अकाेला शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.अकोला येथील गुडधी परिसरातील २९ वर्षीय युवतीची येथील रहिवासी अक्षय कैलास गायकवाडशी फेसबुकच्या माध्यमातून सप्टेंबर २०१९ मध्ये ओळख झाली. अक्षय हा खामगाव येथे कनिष्ठ अभियंता असल्याचे सांगत होता. फेसबुक मैत्रीचे रूपांतरण प्रेमात झाले. १ डिसेंबर रोजी अक्षय एमएच ०४ बीई १६४७ क्रमांकाच्या वाहनाने अकोल्यात आला. दिवसभर शहरात फिरून अकोल्यातील वैभव रेस्टॉरंटच्या परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये युवतीला घेऊन गेला व शितपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप युवतीने केला आहे. या घटनेची चित्रफीत आणि छायाचित्र काढून तो युवतीला ब्लॅकमेल करीत होता. तक्रारीवरून पोलिसांनी प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.
फेसबुकवर ओळख करून अकोल्यातील युवतीवर केला लैंगिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 12:37 IST
Crime News फेसबुकच्या माध्यमातून सप्टेंबर २०१९ मध्ये अक्षय गायकवाडशी ओळख झाली.
फेसबुकवर ओळख करून अकोल्यातील युवतीवर केला लैंगिक अत्याचार
ठळक मुद्देअक्षय एमएच ०४ बीई १६४७ क्रमांकाच्या वाहनाने अकोल्यात आला. गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप युवतीने केला आहे. चित्रफीत आणि छायाचित्र काढून तो युवतीला ब्लॅकमेल करीत होता.