शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 11:09 IST

Buldhana Crime News बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

 लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : ऐन दिवाळीच्या दिवशी संग्रामपूर तालुक्यातील काकनवाडा खुर्द येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली. एका नराधमाने दिव्यांग मुलीवर दिवाळीच्या दिवशी दुपारी १ वाजता दरम्यान  लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार काकनवाडा खुर्द येथील आरोपी सोपान गजानन रसाळे (वय ३४) याने एका २१ वर्षीय जन्मतः बोलता येत नसलेल्या दिव्यांग मुलीला शाैचालयात नेऊन तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. घटनेच्या वेळी मुलगी व तिची आई नळावरून पाणी भरत होती. दोघींनी पाण्याच्या दोन खेपा घरी आणल्यावर एक भांडे रिकामे होते. ते भांडे भरून आणण्यास आईने मुलीला सांगितले. ती पाणी आणण्यासाठी गेली. मात्र बराच वेळ उलटूनही घरी परतली नाही. त्यामुळे तिला बघण्यासाठी आई  गेली असता नळावर दिसून आली नाही. मात्र, जवळच एका घरासमोरील प्रसाधन गृहात तिच्या रडण्याचा आवाज येत होता. त्या आवाजावरून तेथे पाहिले असता आरोपी सोपान रसाळे बळजबरीने अत्याचार करीत असल्याचे दिसून आले. आईने आरडाओरडा करीत आरोपीला चोप दिला व त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तेथून पळ काढला. घटनास्थळावरून घरी परतल्यावर आईने थेट तामगाव पोलिस स्टेशन गाठले. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी सोपान रसाळे याच्यावर बलातत्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करम्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास तामगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार भुषण गावंडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत विखे  करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangrampurसंग्रामपूर