शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या तक्रारीवरुन पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 14:01 IST

पती व सासूविरुद्ध पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल झाल्याची घटना समोर आली आहे.

बुलडाणा: इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारिरीक संबंध केल्याप्रकरणी पतीविरुद्ध शहर पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मानसिक,शारीरिक छळ केल्याप्रकरणी पती व सासूविरुद्ध पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल झाल्याची घटना समोर आली आहे.स्थानिक मिर्झा नगरमधील अकबर खान, नाजीमा खान याच्यासोबत २०१६ मध्ये पीडितेचे मुस्लिम पद्धतीने लग्न झाले. सुरुवातीला सासरच्या मंडळीने चांगली वागणूक दिली. मात्र काही महिन्यानंतर पती व सासूने माहेराहून दोन लाख रुपये आणण्यासाठी मानसिक, शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. माहेरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने व वडील मजूरी करत असल्याने पैसे देणे शक्य झाले नाही. त्यामुळे सासरच्यांनी तिला घराबाहेर काढले. तेंव्हापासून पीडिता माहेरी राहत आहे. याबाबत पीडितेने पती व सासू विरोधात न्यायालयात दाद मागितली असून ते प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. दरम्यान पीडितेचा पती अकबर खान याने २१ जानेवारी २०१९ रोजी फोन करून पीडितेला मिर्झा नगरमधील घरी बोलावले. त्यानंतर इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. पीडितेने प्रतिकार केला असता जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडितीने शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पती अकबर खान इसाक खान विरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. सासू नाजीमा खान विरुद्धही विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे. घटनेचा तपास ठाणेदार शिवाजी कांबळे करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी