शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ऐन सण- उत्सवांच्या काळात पावसाचा फुलशेतीला फटका, भावात दुपटीने वाढ 

By विवेक चांदुरकर | Updated: September 18, 2023 13:57 IST

फळांच्या भावातही वाढ

खामगाव : गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा फूलशेतीला मोठा फटका बसला आहे. हरतालिका व गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलांची आवक घटली असून, भावातही दुपटीने वाढ झाली आहे. डाळींबाचे दर तिप्पट झाले आहेत. पूर्वी ७० ते ७५ रूपये किलो असलेल्या डाळींबाचे दर आता २०० रूपये किलो झाले आहेत.  

शुक्रवार, शनिवारी व रविवारी झालेल्या पावसामुळे फुल उत्पादक शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे फुले सडली आहेत. जिल्ह्यात अनेक शेतकरी झेंडू, गुलाब, लिलीसह फुलांची शेती करतात. तसेच खामगावात पुणे, नाशिकसह अन्य शहरातून फुले मागविण्यात येतात. सण उत्सवांच्या काळात फुलांना चांगली मागणी असते. या दिवसांमध्ये चांगली विक्री होते. त्या आशेवर शेतकरी असतात. मात्र, पावसाने फुले झाडांनाच काळी पडली आहेत. 

तसेच फुले सडली असल्याने शेतकर्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. झेंडूची फुले २०० रूपये किलो, गुलाबाचे फूल पाच रूपयांना एक मिळत आहे. तर शेवंतीचे दर २५० रूपये किलो झाले आहेत. लिलीच्या ५० फुलांची गड्डी १०० रूपयांना मिळत आहे. तसेच फळांच्या दरातही वाढ झाली आहे. डाळींबाची आवक घटली असून, दरही वाढले आहेत. एक महिन्याआधी ७० ते ७५ रूपये किलो असलेल्या डाळींबाचे दर २०० रूपये किलो झाले आहेत. केळी ४० ते ५० रूपयांना एक डझन, सेफ १२० रूपये किलो, चिकूचे दर १२० रूपये किलो झाले आहेत. चिकुच्या दरातही ३० ते ४० रूपयांनी वाढ झाली आहे. वाढत्या महागाइचा ग्राहकांना फटका बसत आहे.

खामगाव शहरात ग्राहकांची गर्दी हरतालिका व गणेश उत्सवासाठी खरेदी करण्याकरिता खामगाव शहरातील अग्रसेन चाैक, मुख्य बाजार लाइन, फरशी परिसर, जलंब नाका परिसरात ग्राहकांची गर्दी झाली होती. पोलिस स्टेशनपासून तर फरशी परिसरपर्यंत हरतालिकासाठी लागणार्या विविध वनस्पतींची विक्री करणारी दुकाने लागली होती. ग्रामीण भागातील महिलांनी केळीची पाने, सिताफळसह विविध वनस्पती विक्रीसाठी आणल्या होत्या. सकाळी ७ वाजतापासून तर दुपारी ४ वाजेपर्यंत शहरात ठिकठिकाणी दुकाने लागली होती. सण उत्सवामुळे फळांच्या दरात मोठी वाढ झाली आहे.   

शेतकरी व ग्राहकांना फटका  पावसामुळे फूल उत्पादक शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. फुले झाडालाच काळी पडली आहेत. त्यामुळे हजारो रूपये खर्च करून शेतकर्यांना आवक घटडली असल्याने भाववाढ झाली आहे. भाव वाढल्याने ग्राहकांनाही फटका बसत आहे.   पावसाने फुलांचे नुकसान झाले आहे. फुलांच्या भावात मोठी वाढ झाली आहे. मात्र त्याचा फायदा शेतकर्यांना कमी तर व्यापार्यांनाच जास्त होत आहे. ग्राहकांनाही त्याचा फटका बसत आहे.  - पदमाकर खुमकरफुल उत्पादक शेतकरी, जलंब

टॅग्स :buldhanaबुलडाणाfruitsफळे