शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
2
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
3
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
4
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
5
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
6
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
7
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
8
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
9
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
10
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
11
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
12
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
13
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
14
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
15
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
16
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
17
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
18
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
19
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
20
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS

पाऊस थांबला, शेतकऱ्यांचा संघर्ष कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 14:25 IST

अनेक शेतामध्ये सोयाबीनच्या सुड्या शेतातच सडल्या आहेत. त्यामुळे आता पावसाने उघडीप दिली असली तरी शेतकºयांचा संघर्ष सुरूच आहे.

- ब्रम्हानंद जाधव   लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात अति पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवरच पाणी फेरले आहे. शेत आणि शेतरस्ते जलमय झालेले आहेत. पावसाच्या ताडाख्यातून उरला-सुरला शेतमाल घरी आणणे शेतकऱ्यांसाठी कठीण झाले आहे. अनेक शेतामध्ये सोयाबीनच्या सुड्या शेतातच सडल्या आहेत. त्यामुळे आता पावसाने उघडीप दिली असली तरी शेतकºयांचा संघर्ष सुरूच आहे.जिल्ह्यात पावसाने ९० टक्क्यापेक्षा जास्त पिकांचे नुकसान झालेले आहे. अनेक शेतकºयांच्या सोयाबीनच्या सुड्या शेतकºयांच्या डोळ्यासमोरून शेतातून वाहून गेल्या. जिल्ह्यात विविध भागात मोठ्या प्रमाणावर नुकसानझाले आहे़ मका, कापूस, ज्वारी आणि सोयाबीनचे हाताशी आलेले उत्पादन शेतकºयांना गमवावे लागले आहे़ सध्या पावसाने उघडीप दिली आहे. मात्र शेतात साचलेल्या पाण्यामुळे शेतकºयांना पाय ठेवायला जागा सुद्धा राहिली नाही. शेतातील दलदल पाहून शेतात पावसापासून वाचलेला काही माल घरी आणणे अवघड होऊन बसले आहे. अनेक शेतकºयांच्या सोयाबीनच्या सुड्या शेतातच उभ्या आहेत. सोयाबीनच्या सुड्या काढण्यासाठी एकही मळणीयंत्र शेतात पोहचू शकत नाही. काही सोयाबीनच्या सुड्या तर जाग्यावरच काळवंडल्या आहेत. त्यामुळे अशा सोयाबीनच्या सुड्या काढाव्या की, नाही हाच मोठा प्रश्न शेतकºयांसमोर आहे.

शेतमाल घरापर्यंत पोहोचणार का?अनेकांच्या शेतात आजही सोयाबीनच्या सुड्या लागलेल्या आहेत. तो शेतमाल घरापर्यंत पोहचेल की नाही याची शाश्वती राहिली नाही. शेत आणि शेतरस्ते जलमय झाल्याने शेतात ट्रॅक्टर किंवा मळणीयंत्रण जाऊ शकत नाही. गेल्यास ते ट्रॅक्टर फसण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत.एकाच ठिकाणी बसून तलाठी जुळवताहेत शेतकºयांच्या याद्यापावसाने झालेल्या नुकसानानंतर शेतकºयांना तातडीने मदत मिळावी, यासाठी प्रशासनाकडून मोठी तत्परता दाखवण्यात आली. त्यासाठी सर्वेच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या. परंतू अनेक तलाठी एकाच ठिकाणी बसून शेतकरी आणि त्यांचा पेरा याची यादी तयार करताना आढळून आले. मेहकर तालुक्यातील काही गावांमध्ये तलाठ्यांनी शेतात न जाताच गावात बसूनच याद्यांची जुळवाजुळव केल्याचे दिसून आले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagricultureशेती