शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे भिंत पडली; युवक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 18:23 IST

पावसामुळे घराची भिंत कोसळून एक युवक जखमी झाला.

रविवारी मध्यरात्री घडली घटना: सुदैवाने जिवीत हानी नाहीचांडोळ:  बुलडाणा तालुक्यातील धाड नजीक असलेल्या चांडोळ येथे येथे रविवार जोरदार पावसामुळे घराची भिंत कोसळून एक युवक जखमी झाला. दरम्यान, सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवीत हानी झाली नाही. दरम्यान, भिंतीच्या मलब्याखाली दबलेल्या अरुण देशमुख यास नागरिकांनी त्वरेने बाहेर काढल्याने मोठी अनुचीत घटना टळली.रविवारी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे  चांडोळ येथील भुजंगराव देशमुख व शेख बशीर यांच्या घराची सामायिक भिंत रात्री अचानक पडली. यावेळी मोठा आवाज झाल्याने त्यांचे शेजारी झोपेतून जागे झाले. घडलेल्या संपूर्ण प्रकार निदर्शनास आल्यास भिंतीखाली दबलेल्या अरुण देशमुख या युवकास मोठे कसब दाखवत नागरिकांनी बाहेर काढले. या भिंतीच्याच शेजारी असलेल्या पलंगावर अरुण देशमुख व बाजूला त्याचे वडील भुजंगराव देशमुख सुद्धा झोपले होते. भिंत पडल्याने अरुण भिंतीच्या मलब्याखाली दबला होता. त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले असले तरी त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. भिंत पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे.या घटनेचा पंचनामा तलाठी देठे व कोतवाल जितेश राऊत यांनी करीत बुलडाणा तहसिल कार्यालयास अहवाल पाठविला आहे. दरम्यान, नुकतसेच घरातील भिंतीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे पडलेल्या भिंतीचा पंचनामा तलाठी देठे व कोतवाल जितेश राऊत यांनी केले असून त्याचा अहवाल बुलडाणा तहसीलदार यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त कुटुंबियांना शासनाने त्वरेने मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस