शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अवैध सावकारी प्रकरणी सहकार विभागाचे दहा ठिकाणी छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 22:35 IST

तब्बल दहा ठिकाणी हे छापे टाकून २६  एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये बुलडाणा येथे सहा पथकांनी कारवाईत सहभाग घेतला होता.

बुलडाणा: महाराष्ट्र सावकारी अधिनियमातंर्गत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला प्राप्त झालेल्या पाच अवैध सावकारी बाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने सहकार विभागाने बुलडाणा, खामगाव, चिखली आणि शेगाव तालुक्यात दहा ठिकाणी छापे मारून आक्षेपार्ह्य कागदपत्रे जप्त केली आहे. दरम्यान, २६ एप्रिल रोजी झालेल्या या कारवाईत सहकार विभागातील प्रशासन व लेखा परिक्षण विभागातील आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे असे मिळून तब्बल ७० अधिकारी कर्मचा-यांनी सहभाग घेतला होता.तब्बल दहा ठिकाणी हे छापे टाकून २६  एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये बुलडाणा येथे सहा पथकांनी कारवाईत सहभाग घेतला होता. त्यात सुशील सुभाषराव देशमुख (रा. बुलडाणा) यांच्या घरी नोंदणीकृत खरेदी खते, ताबे इसार पावती, मुदत वाढीचे लेखे, प्रतिज्ञा लेख असे आक्षेपार्ह्य दस्ताऐवज मिळून आले. दरम्यान त्यांच्या दुकानावर नोंदणीकृत खरेद्या, गहाणखत, चेकबुक असे दस्त मिळाले असल्याचे सहकार विभागाने सांगितले. दरम्यान सुवर्णनगरमधील प्रितपालसिंग सोनुसिंग सेठी यांच्याकडेही घरी आणि गुरुनाक गेस्ट हाऊस येथे छापे मारून कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यामध्ये  नोंदणीकृत खरेदीखते, कोरे चेक, कोरे स्टॅम्पपेपर, प्रतिज्ञालेख असे आक्षेपार्ह्य साहित्य मिळून आले. दरम्यान, बुलडाणा शहरातीलच भगवान महाविर मार्गलगत प्रितेश सुरेश संचेती यांच्या घरी व  कार्यालयात झडती घेण्यात आली. तेथून १०० रुपयाचे स्टॅम्पपेपर, भागीदारी करारनामा आढळून आला असून ही कागदपत्रे पथकाने ताब्यात घेतली आहेत.दरम्यान, खामगाव तालुक्यातील बोरजवळा येथील शोभाबाई वासुदेव बोंबटकर आणि शेगाव राम भीमराव पांडे व संजय भीमराव पांडे (रा. रोकडीया नगर) येथेही छापे टाकून खरेदी खत, संमतीपत्र व सौदाचिठ्ठी आदी दस्तऐवज तपासण्यात आले आहेत. चिखली येथील नसीमशेख हारून (वार्ड. नं. २१, भीमनगर) आणि काजल आसिफ नुरखाँ यांच्याकडे (जु्न्या तहसिल कार्यालयासमोर) येथेही तपासणी करण्यात येऊन ताबेपावती, संमतीपत्र, इसारपावत्या व खरेदीखते अशी दस्ताऐवज मिळून आले. दरम्यान, सहकार विभागाने केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध सावकारी करणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

७० अधिकारी कर्मचार्यांचा ताफाजिल्ह्यात २६ एप्रिल रोजी धडकपणे हे छापे टाकण्यात आले असून या मध्ये जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, जिल्हा उपनिबंधक (सावकारी) नानासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी एकचे सहकार अधिकारी जी. जे. आमले, सहकारी संस्थेचे विशेष लेखापरीक्षक डी. पी. जाधव, डी. आर. इटे, सहाय्यक निबंधक ए. बी. सांगळे, आर. टी. अंभोरे, एस. डी. नरवाडे, ओ. एस. साळुंके, लेखा परीक्षक ए. पी. हिवरखेडे, सहाय्यक निबंधक जी. पी. साबळे, सहकार अधिकारी आर. आर. सावंत यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :buldhanaबुलडाणा