शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात वरली अड्डय़ावर छापा; १२ आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 01:56 IST

खामगाव:  शहरापासून नजीकच असलेला एक वरली-मटका अड्डा उपविभागीय पोलीस पथकाने मंगळवारी सायंकाळी उद्ध्वस्त केला. या धाडसी कारवाईत १२ आरोपींना अटक करण्यात आली असून, ९ मोटारसायकलसह ४१ मोबाइल जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली  असून, अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. 

ठळक मुद्देउपविभागीय पोलीस पथकाची जम्बो कारवाई

खामगाव:  शहरापासून नजीकच असलेल्या एमआयडीसीतील वरली-मटका अड्यावर उपविभागीय पोलिस पथकाने मंगळवारी सायंकाळी छापा टाकला. या धाडसी कारवाईत १२ आरोपींना अटक करण्यात आली असून, ९ मोटारसायकलीसह ४१ मोबाईल जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली  असून, अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. शिवाजी नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एमआयडीसी परिसरात एका दुमजली इमारतीत वरली-मटका अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. या गुप्त माहितीच्या आधारे संबंधीत जागेवर पाळत ठेवून छापा टाकण्यात आला असता, वरली-मटक्याचे मोठे घबाडच याठिकाणी मिळून आले. पथकाने ७ हजार ५९0 रुपये रोख, पोलिस  ९ दुचाकी मोटार सायकल, ४१ मोबाईल, टीव्ही, इन्र्व्हर्टर , प्रिज, संचासह एकुण ३ लाख ५७ हजार ३५0  रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पोलिस अधीक्षक शशिकुमार मीना, अप्पर पोलिस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरिक्षक रूपेश शक्करगे, पोउपनि बालाजी महाजन,  पाहेकॉ कोल्हे, रविंद्र इंगळे, पो.ना. सुधाकर थोरात, नितीन भालेराव, पो.कॉ. रतन गिरी, गवारगुरू, राम धामोडे, सुनील बैनाडे, विक्रम राठोड, विनायक मानकर, सै. जावेद यांनी जुगार अड्डयावर छापा टाकला. 

पोलिसांकडून १२ दिवसांपासून पाळत!एमआयडीसी परिसरातील दुमजली इमारतीतील जुगार अड्डय़ावर छापा टाकण्यापूर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी पथक १२ दिवसांपासून संबंधित जागेचे लोकेशन घेत होते. आरोपी वारंवार घटनास्थळ बदलत होते. दरम्यान, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास संबंधित ठिकाणाचे लोकेशन मिळाले. दरम्यान, शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर जुगार अड्डा असतानाही कारवाई करण्यात येत नसल्याने शिवाजी नगर पोलीस संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहेत.

आरोपींमध्ये बड्या माशांचा समावेश! एमआयडीसी परिसरात मंगळवारी सायंकाळी करण्यात आलेल्या धाडसी कारवाईत अनेक बडे मासे गळाला लागले. त्यामुळे कारवाई झाल्याचे समजताच अनेकजण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या आसपास फिरताना दिसून आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राजकुमार रामगोपाल राठी (५५) रा. बालाजी प्लॉट, खामगाव. अजय अवधूत भगत (३२), रा. आठवडी बाजार, नांदुरा, नारायणदास सीताराम भुतडा (७२), रा. पुरवार गल्ली, खामगाव, मुकेश भास्करराव चव्हाण (३५) रा. अभय नगर, खामगाव, अक्षय संजय मोरे (२२), रा. काळेगाव ता. खामगाव, विठ्ठल महादेव राहणे (३५), रा. स्नेहलनगर वाडी, खामगाव, समीर महेंद्र मंत्री (३९), रा. स्टेशन रोड बारादरी खामगाव, योगेश नंदकिशोर हिरवाणे (३0), दाळफैल, खामगाव, पंकज विनोद सोमाणी (३९), रा. श्यामलाल प्लॉट खामगाव, राकेश श्रीराम हिरवाने (४२), दाळफैल, खामगाव, प्रकाश नामदेव इंगळे (५६), काळेगाव ता. खामगाव, राजेंद्र मदनलाल हिरवाने (४७), दाळफैल, खामगाव यांचा समावेश आहे. 

 

एमआयडीसी परिसरात मोठय़ा प्रमाणात वरली-मटका सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पाळत ठेवून कारवाई करण्यात आली आहे. १२ आरोपी अटकेत असून, पुढील तपासात आणखी काही जणांची नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.- प्रदीप पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी, खामगाव. 

टॅग्स :khamgaonखामगावCrimeगुन्हा