शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात रेती तस्करीचे रॅकेट सक्रीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 18:39 IST

नदीपात्रातून दिवसा एका रॉयल्टीमागे दररोज अनेक गाड्या भरून जात असल्याने शासनाचा करोडो रूपयाच्या महसूल बुडत आहे.

- किशोर खैरेनांदुरा :  बुलडाणा जिल्ह्यात पकडण्यात आलेल्या रेती घाटांचे लिलाव सुरू आहेत. रेती साठ्यामागे रेती तस्करीचे रॅकेट सक्रीय असून नदीपात्रातून दिवसा एका रॉयल्टीमागे दररोज अनेक गाड्या भरून जात असल्याने शासनाचा करोडो रूपयाच्या महसूल बुडत आहे. यात तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय महसुल अधिकारी रेती तस्करांना सहकार्य करीत असल्याचे बोलले जाते. रेती परवाना घेतल्यानंतर एका रॉयल्टीवर सकाळी ५  ते संध्याकाळी ६ वाजेपर्यत मुदत असते. एकच रॉयल्टी दिवसभर रेती वाहतुकीसाठी वापरण्यात येते. एका रॉयल्टीवर ४ ते ५ रेतीच्या ट्रिप मारल्या जातात. एक ब्रास रेतीच्या परवान्यावर १५ ते २० ब्रास रेतीची वाहतूक करण्यात येते. २०० ब्रास रेती हर्रासीत घेतल्यानंतर नदीपात्रातून ८०० ते १ हजार ब्रास रेती उचलली जाते. हे सर्व महसुल प्रशासनाला माहित असूनही सर्व काही बिनदिक्कतपणे सुरू आहे. यात लाखो रूपयांची कमाई होत असल्याची चर्चा आहे. यात महसुल अधिकाºयांचाही सहभाग आहे.रेती वाहतुकदार, महसुल अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्या संगनमताने नदीपात्रातून मध्यरात्री १० ते पहाटे ४ वाजेपर्यंत रेतीची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू राहते. रात्रीच्या वेळी अधिकारी, कर्मचारीही जाणीवपूर्वक येत नाहीत. रेती वाहतुकदार व अधिकाºयांमध्ये असलेले साटे-लोटे याला कारणीभूत असल्याचे बोलल्या जाते. खामगाव येथे १५ मे रोजी झालेल्या हर्रासीत रेती विकल्या गेली. १७ मे रोजीही रेतीची हर्रासी झाली. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी दुबे संपर्क करण्याच्या प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. 

अशी होते रेती तस्करीजिल्ह्यातील काही रेती तस्कर स्वत: रेती उपसून २०० ब्रास रेतीचा साठा तयार करतात. काही दिवसानंतर तो घाट महसुल अधिकारी छापा मारून जप्त करतात. यानंतर पकडलेल्या रेतीची ९०० ते १००० ब्रास रेती कागदोपत्री दाखवून हर्रासी केली जाते. ही हर्रासी बुलडाणा एका अधिकाºयांच्या उपस्थितीत केली जाते.

नांदुºयात झाली रेती हर्रासीची तडजोड१८ एप्रिल रोजी नांदुरा तहसीलमध्ये झालेल्या हर्रासीमध्ये रेती १६७० रूपये ब्रास भावाने रेती विकेल्या गेली होती. यात सर्वांचे चांगभले झाले. या झालेल्या गैरप्रकाराबाबत प्रकरण उच्च न्यायालयात गेल्याचे समजते. त्यामुळे कमी भावात रेती विकणारे महसुल अधिकारी अडचणीत येणार आहेत.

टॅग्स :khamgaonखामगावNanduraनांदूराsandवाळू