शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

२२ हजार हेक्टरवर बहरली रब्बीची पिके!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 16:36 IST

तालुक्यात २२ हजार ४०० हेक्टरवर गहू, हरभरा, कांदा पिकाची लागवड करण्यात आली आहे.

-  देवेंद्र ठाकरे लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: गत पावसाळ्यात झालेला प्रचंड पाऊस बघता, चालु रब्बी हंगामात खामगाव तालुक्यात पेरणीयोग्य क्षेत्रापैकी सुमारे २५ टक्के क्षेत्रावर रब्बीची पिके बहरली आहेत. सध्या पिकांची असलेली स्थिती पाहता, शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची आशा आहे. तालुक्यात २२ हजार ४०० हेक्टरवर गहू, हरभरा, कांदा पिकाची लागवड करण्यात आली आहे.खामगाव तालुक्यात साधारणपणे गत चार ते पाच वर्षांपासून रब्बीचे क्षेत्र सतत कमी झाले होते. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाचा सातत्याने सामना करावा लागला. विशेष म्हणजे गतवर्षी रब्बीचा पेरा नसल्यासारखाच होता. परंतु गत पावसाळ्यात जिल्ह्यात सगळीकडेच प्रचंड पाऊस पडला. पावसाचे प्रमाण अति असल्याने शेतकºयांचा खरीप हंगाम पुर्णत: हातून गेला. एकही पिक समाधानकारक आले नाही. सगळीकडे ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. परंतु हीच अतिवृष्टी रब्बी हंगामासाठी लाभदायक ठरत असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. त्यामुळेच खामगाव तालुक्यात गत पाच ते सहा वर्षांच्या तुलनेत यावर्षी रब्बीचा पेरा मोठ्या प्रमाणावर झाला झाल्याचे दिसून येत आहे. कोणतेही नैसर्गिक संकट आले नाही, तर यावर्षी गहू, हरभरा उत्पादनात वाढ होईल, अशी आशा शेतकºयांना आहे. एकूण २२४०० हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली असली तरी कांद्याची लागवड सुरूच असल्याने या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.अशी झाली पेरणीखामगाव तालुक्यात एकूण पेरणी योग्य क्षेत्र ७९ हजार हेक्टर आहे. यातील ११ हजार ९०० हेक्टरवर गव्हाची पेरणी झालेली आहे. ७ हजार हेक्टरवर हरभरा, १ हजार हेक्टरवर मका बहरला तर २ हजार ५०० हेक्टरवर कांदा पिकाचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेतीFarmerशेतकरी