शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाच्या पीक कर्जासाठी दाखवली जाते रब्बीची वाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 12:01 IST

खरीपाचे पीक कर्ज बंद होत असल्याचे सांगूण अनेक बँका शेतकऱ्यांचे प्रस्ताव घेण्यास नकार देत आहेत.

- ब्रह्मानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कर्जमाफीत नाव न आल्याने शेतकऱ्यांना अनेक दिवस खरीप पीक कर्जासाठी ताटकळत ठेवण्यात आले; परंतू आता नाव आल्यानंतरही शेतकरीपीक कर्जापासून वंचीत आहेत. खरीपाचे पीक कर्ज बंद होत असल्याचे सांगूण अनेक बँका शेतकऱ्यांचे प्रस्ताव घेण्यास नकार देत आहेत. खरीप पीक कर्जासाठी आलेल्या शेतकºयांना आता बँकांकडून रब्बीची वाट दाखवली जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.जिल्ह्यात खरीप पीक कर्जावरून सुरूवातीला मोठे रणकंदन झाले. लोकप्रतिनिधी आक्रमक झाल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्हाभर पीक कर्जाचे मेळावे घेऊन पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. दरवर्षी पेक्षा यंदा पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढणार असल्याचा दावा, प्रशासनाकडून करण्यात आला. त्यासाठी बँक व्यवस्थापकांची वांरवार बैठकी झाली. पीक कर्ज नाकारणाºया किंवा मुदतीमध्ये पीक कर्जाची प्रक्रिया पूर्ण न करणाºया बँक व्यवस्थापकांवर गुन्हे दाखल करण्यापर्यंत विषय गेला होता. पालकमंत्र्यांनी प्रत्येक शेतकºयांना पीक कर्ज मिळणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतू हे सर्व प्रयत्न पालथ्या घड्यावर पाणीच ठरले. खरीप हंगाम संपत आला तरी अद्यापही उद्दिष्टांच्या ५० टक्के शेतकºयांना पीक कर्जच मिळाले नसल्याचे दिसून येत आहे. पीक कर्जासाठी बँकांनी शेतकºयांना वेठीस धरल्याच्या तक्रारी वारंवार समोर आल्या आहेत. शासनाच्या कर्जमाफीत शेतकरी बसले, परंतू त्यांची नावे यादीत आली नसल्याने त्यांना बँकानी पीक कर्ज दिले नाही. जेंव्हा कर्जमाफीमध्ये नाव आले, तेंव्हा आधार प्रमाणीकरणासह अनेक कागदपत्रांसाठी शेतकºयांना पीक कर्जापासून ताटकळत ठेवण्यात आले. आता अनेक शेतकºयांच्या फाईल बँकाकंडे पडून आहेत. त्यांना खरीपा ऐवजी रब्बीचे पीक कर्ज घेण्याचा सल्ला दिला जात आहे. तर काही बँकाकडून नवीन फाईल स्विकारण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा प्रकार अनेक बँकामध्ये समोर आला आहे. तुमचे काम सप्टेंबरमध्ये होईल असे सांगून आतापर्यंत पीक कर्जासाठी प्रतीक्षेत ठेवलेल्या शेतकºयांना आता रब्बीचे पीक कर्ज घ्यावे, लागेल असे म्हणून परत पाठविले जात असल्याची माहिती शेतकºयांनी दिली.पीक कर्ज वाटपाची अंतीम मुदत ही ३० सप्टेंबर आहेत. जिल्ह्यात ८४ टक्के पीक कर्ज वाटप पूर्ण झालेले आहे. आता उर्वरीत शेतकºयांना रब्बीचे पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे.-नरेश हेडाऊजिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, बुलडाणा.पीक कर्ज वाटपाची मुदत संपत आलेली आहे. त्यामुळे आता पीक कर्जासाठी आलेल्या शेतकºयांना रब्बीचे पीक कर्ज देण्यात येईल.-संयोग सिंग, बँक आॅफ महाराष्ट्र, घाटबोरी.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी