शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
6
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
7
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
8
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
9
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
10
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
11
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
12
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
13
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
14
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
15
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
16
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
17
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
18
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
19
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
20
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा

रा. स्व. संघाने मराठा सेवा संघावर संघर्ष लादला - पुरुषोत्तम खेडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 03:30 IST

सिंदखेडराजा: संपूर्ण राज्यात घडविण्यात आलेला कोरेगाव भीमा संघर्ष हा राष्ट्रीय  स्वयंसेवक संघाने मराठा सेवा संघावर लादल्याचा घणाघात मराठा सेवा संघाचे संस्था पक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी शुक्रवारी येथे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त आयोजित  कार्यक्रमात केला. 

ठळक मुद्देराष्ट्रमाता माँ जिजाऊ ४२0 वा जन्मोत्सव कोरेगाव-भीमा येथील घटनेबाबत पुरुषोत्तम खेडेकर यांचा घणाघात

लोकमत न्यूज नेटवर्क सिंदखेडराजा: संपूर्ण राज्यात घडविण्यात आलेला कोरेगाव भीमा संघर्ष हा राष्ट्रीय  स्वयंसेवक संघाने मराठा सेवा संघावर लादल्याचा घणाघात मराठा सेवा संघाचे संस्था पक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी शुक्रवारी येथे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त आयोजित  कार्यक्रमात केला. मराठा सेवा संघाच्यावतीने आयोजित ४२0 व्या राष्ट्रमाता माँ जिजाऊ जन्मोत्सवाच्या या  कार्यक्रमास सातार्‍याचे छत्रपती खा. उदयनराजे भोसले, कोल्हापूरचे छत्रपती खासदार  संभाजीराजे भोसले, तंजावरचे छत्रपती बाबाजीराजे भोसले,  खा. प्रतापराव जाधव, आ.  शशिकांत खेडेकर, माजी खासदार नाना पटोले, छत्रपती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष  स्वप्निल खेडेकर, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, महासचिव मधुकर  मेहकरे, संभाजी ब्रिगेडचे आखरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तु पकर, माजी आमदार रेखाताई खेडेकर, गंगाधर बनबरे, कामाजी पवार, हरियाणाचे  मांगीराम चोपडे यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी प्रामुख्याने विचारपीठावर उ पस्थित होत्या.अँड. पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले, की  ‘आरएसएस’ने कोरेगाव-भीमा संघर्ष  ‘एमएसएस’वर लादला आहे. त्यामुळे आपले मूळ काम हे आता वाढले आहे. सर्व  समाजात बंधुता निर्माण करण्यासाठी मराठा सेवा संघाची जबाबदारी त्यामुळे वाढली  आहे. त्यामुळे सर्व संघटनांनी आपला धर्म बाजूला ठेवून विकासाच्या मुद्यावर बोलावे.  कोणाचाही अपमान होईल, असे बोलू नये, असेही ते म्हणाले. श्री छत्रपती शिवाजी  महाराज हे सर्वांसाठी आदर्श असून, त्यांच्या संदर्भात कोणीही अनुचित बोलू शकत नाही.  बहुजन समाजाध्ये वाद नाही. राजकीय पक्षांमध्ये वाद आहेत. त्यामुळे आपला शत्रू कोण  आहे, याची जाणीव   आता युवा वर्गाला होण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. दरम्यान,  १९ फेब्रुवारीला देशमुख, पाटील असा आपल्या पदव्या बाजूला ठेवून मूळ आडनाव  पुन्हा धारण करण्याचे आवाहन त्यांनी केले. एम फॅक्टर एकत्र यावेत, अशी अपेक्षा  त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान संभाजी ब्रिगेडचे मनोज आखरे यांनी, संभाजी  ब्रिगेड एक राजकीय पर्याय उभा करू शकते. आर्थिक दहशतवाद संपवून बंधुभावाने  काम कसे करता येईल, याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे, असे ते म्हणाले.  यावेळी जतीन पटेल, मांगीराम चोपडे यांची समयोचित भाषणे झाली. माजी खासदार नाना  पटोले यांचेही भाषण झाले.

उद्योजकांचे ठसे घेतले होते का? - रविकांत तुपकरशेतकर्‍यांची कर्जमाफी करताना त्यांच्या हाताचे ठसे राज्य शासनाने घेतले; पण अंबानी,  अदानींसारख्या बड्या उद्योजगांचे कर्ज माफ करताना त्यांच्या हाताचे ठसे घतले होते का,  असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर यांनी केला. मल्ल्या तर चुना लावून निघून गेला. त्याचे काय केले, असा प्रस्न उपस्थित करत राज्य  शासनाच्या दुटप्पी भूमिकेवर त्यांनी टीका केली. समाजासमोर शेतकरी आत्महत्या हा  मोठा प्रश्न असला तरी शेतकर्‍यांच्या घरातील मुलींच्याही आता आत्महत्या होत आहे.  ही एक गंभीर बाब असून, आतापर्यंत १६ ते १८ वयोगटातील मुलींनी आत्महत्या  केल्याचे त्यांनी सांगितले.

जिजाऊ सृष्टीवर सामाजिक  विचारांचे मंथन - प्रतापराव जाधवजिजाऊ सृष्टीवर सामाजिक विचारांचे मंथन होते. सत्तेवर बसलेले आपल्यामुळेच  बसलेले आहेत. त्यामुळे आगामी काळात समाज संघटित करून जो चांगले काम करेल,  असा विश्‍वास असेल त्याच्या बाजूने कौल द्या, असे आवाहन खा. प्रतापराव जाधव यांनी  केले.

शिवरायांचे विचारच देशाला तारु शकतात!सध्या सत्तेत कोण आहे किंवा कोण नाही, याला आपण महत्त्व देत नाही. राजकारणी  लोक महत्त्वाचे विषय बाजूला ठेवून भलत्याच विषयांचा बाऊ करतात. असेच राहिले तर  देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. व्यक्ती स्वार्थ आणि द्वेषापोटी तरुणाईसमोर  अवडंबर माजविले जात आहे. जाती, धर्म भेद संपुष्टात आणण्यासाठी माँ जिजाऊ आणि  शिवरायांचे विचारच देशाला तारू शकतात, असे त्यांनी सांगितले.- छत्रपती उदयनराजे भोसले

तंजावरमध्ये या, संस्कृती जोपासा! तामिळनाडूतील तंजावरमध्ये या. तेथे तमिळ आणि मोडी लिपीतील लाखो दस्तावेजांमध्ये  मराठा समाजाचा दैदिप्यमान इतिहास सामावलेला आहे. तो आपला सर्वांचा आहे. त्याचे  जतन करून संस्कृती जोपासण्याची आपल्याला गरज आहे. आपल्या सर्वांचा हा इतिहास  तिथे जिवंत ठेवलेला आहे, असे छत्रपती बाबाजीराजे भोसले म्हणाले.- छत्रपती बाबाजीराजे भोसले

.तो दिवस ‘ब्लॅक डे’ होता     मध्यंतरी घडलेली घटना पाहता तो दिवस महाराष्ट्रासाठी ‘ब्लॅक डे’ होता. भविष्यात पुन्हा  असा प्रकार होऊ नये. महाराष्ट्राला गालबोट लागू नये, अशी भावना        छत्रपती  संभाजी राजे भोसले यांनी विचारपीठावरून बोलताना व्यक्त केली. महाराष्ट्रात सध्या  काय चाललेय? शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती, बहुजन समाजाला सोबत घेऊन  राज्य केले. शाहू महाराजांनी ५0 टक्के आरक्षण दिले. सिंदखेडराजा ही बहुजन  समाजाला विचार देण्याची जागा आहे. जिजाऊंचा आदर करायचा असेल तर शिवाजी  महाराज समजून घेणे आवश्यक आहे. ते असामान्य कसे झाले, याचा अभ्यास झाला  पाहिजे, असे ते म्हणाले. - छत्रपती संभाजीराजे भोसले

रायगड प्राधिकरणासाठी ६00 कोटी रायगड प्राधिकरणासाठी ६00 कोटी रुपये मंजूर झाले असून, येत्या २0 ते २५ दिवसात  प्रत्यक्ष त्याचे काम सुरू होईल. या निधीतून रायगडचे संवर्धन होण्यासोबतच परिसराच्या  विकासालाही प्राधान्य मिळणार आहे. रायगड, राजगड, पन्हाळा, मराठवाड्यातील,  खान्देशातील एक अशा प्रमाणे एक-एक किल्ला घेऊन त्याचे संवर्धन  होणे क्रमप्राप्त  आहे. किल्ले संवर्धनाच्या योजनेत जिजाऊ सृष्टीचाही समावेश करण्याचा आपण प्रयत्न  करू, असे प्रतिपादन यावेळी बोलताना छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले.

पुरस्कार प्रदान उद्योजक संजय वायाळ यांना मराठा उद्योजक विश्‍वभूषण पुरस्कार, विजय तनपुरे यांना  मराठा विश्‍व शिवशाहीर, तर अँड. मिलिंद पवार यांना मराठा भूषण पुरस्कार प्रदान  करण्यात आला. जिजाऊ पुरस्कार लेफ्टनंट स्वाती महाडिक यांना जाहीर झाला होता. तो  त्यांच्या आई रंजना आणि वडील बबन शेंडगे यांनी स्वीकारला.

टॅग्स :purushottam khedekarपुरुषोत्तम खेडेकरJijau Janmotsavजिजाऊ जन्मोस्तवSindkhed Rajaसिंदखेड राजा