शासकीय गोदाम बांधकामाच्या मान्यतेवर प्रश्नचिन्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 01:39 PM2019-02-18T13:39:27+5:302019-02-18T13:39:39+5:30

- ब्रम्हानंद जाधव बुलडाणा : जिल्ह्यात ५ हजार ७६० मेट्रीक टन क्षमतेच्या चार शासकीय गोदामांचे बांधकाम प्रस्तावित आहे. या ...

Questioning the official warehouse construction! | शासकीय गोदाम बांधकामाच्या मान्यतेवर प्रश्नचिन्ह!

शासकीय गोदाम बांधकामाच्या मान्यतेवर प्रश्नचिन्ह!

Next


- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: जिल्ह्यात ५ हजार ७६० मेट्रीक टन क्षमतेच्या चार शासकीय गोदामांचे बांधकाम प्रस्तावित आहे. या कामासाठी सात कोटींवर निधीला शासनाच्या अन्न, नागरी व पुरवठा विभागाने मान्यता दिली आहे. मात्र निर्णयानंतरही संबंधीत अधिकाºयांपर्यंत याबाबत कुठलेच पत्र किंवा माहिती उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील शासकीय गोदाम बांधकामाच्या मान्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शासकीय गोदामांची साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून नवीन गोदामांचे बांधकाम प्रस्तावित आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धान्याच्या साठवणुकीसाठी जिल्ह्यातील काही गोदामांच्या बांधकामाचे प्रस्ताव शासानाकडे पाठविण्यात आले होते. जिल्ह्यातील मोताळा, सिंदखेड राजा, मेहकर व बुलडाणा तालुक्यातील पोखरी येथे शासकीय गोदाम बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने सहमती दर्शविली आहे. त्यानंतर शासकीय गोदाम बांधकामाच्या अंदाजपत्रकास व कामास नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधीअंतर्गत मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये मोताळा, सिंदखेड राजा, मेहकर व बुलडाणा तालुक्यातील पोखरी येथील ५ हजार ७६० मेट्रीक टन क्षमतेच्या शासकीय गोदाम बांधकामांचा समावेश आहे. या चारही शासकीय गोदामांच्या बांधकामासाठी सात कोटी २१ लाख ३६ हजार ४०५ रुपये निधी १५ फेब्रुवारी रोजी शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मंजूर केला आहे. मेहकर येथे १ हजार ८०० मेट्रीक टन क्षमतेच्या गोदामासाठी १ कोटी ९८ लाख १९ हजार रुपये निधी, मोताळा येथे १ हजार ८० मेट्रीक टन क्षमतेच्या गोदामासाठी १ कोटी १९ लाख ५० हजार ४०५ रुपये निधीला मान्यता देण्यात आली आहे. सिंदखेड राजा येथील १ हजार ८० मेट्रीक टन क्षमतेच्या गोदामासाठी १ कोटी ५५ लाख ९० हजार रुपये व बुलडाणा तालुक्यातील पोखरी येथील १८०० मेट्रीक टन क्षमेच्या गोदाम बांधकामासाठी २ कोटी ४७ लाख ७७ हजार रुपये निधीला मान्यता देण्यात आली आहे. परंतू या मान्यतेसंदर्भात अद्यापर्यंत जिल्हा पुरवठा विभाग, संबधीत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यापर्यंत कुठलेच पत्र प्राप्त झाले नाही. यासंदर्भात संबंधीत अधिकारीच अनभिज्ञ असल्याची माहिती समोर आली आहे.

 
जिल्ह्यातील गोदामांची क्षमता आठ हजार ८०० मेट्रीक टन
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धान्याच्या साठवणुकीसाठी जिल्ह्यात असलेल्या २० शासकीय गोदामांची क्षमता आठ हजार ८०० मेट्रीक टन आहे. धान्याच्या साठवणुकीसाठी ही गोदामे अपूरी पडत असल्याने जिल्ह्यात नवीन गोदामांचे बांधकाम प्रस्तावित आहेत. त्यासाठी अनेक ठिकाणावरून जिल्हाधिकाºयांपर्यंत शासकीय गोदामांची मागणी करण्यात आलेली आहे.
 
जिल्ह्यात शासकीय गोदामांचे बांधकाम प्रस्तावित आहे. परंतू नवीन गोदामाच्या बांधकामासाठी निधीला मान्यता मिळाल्यासंदर्भात कुठलेही पत्र प्राप्त झाले नाही.
- बी. यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, बुलडाणा.

Web Title: Questioning the official warehouse construction!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.