शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शाळांच्या वाढीव अनुदानाचा प्रश्न प्रलंबित; बिनपगारी शिक्षक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 12:13 IST

२० टक्के अनुदान प्राप्त शाळा, अनुदानास पात्र झालेल्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, वर्गतुकड्या यांची परत तपासणी करण्यास शिक्षकांकडून विरोध होताना दिसून येत आहे.

बुलडाणा : राज्यातील विनाअनुदानित तथा अंशत: अनुदानित शाळा-महाविद्यालयांचा वाढीव अनुदानाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तसेच बिनपगारी शिक्षकांनी आता आक्रमक भूमीका घेतली आहे. त्यामुळे परीक्षा कामावर याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.राज्यातील विनाअनुदानित तथा अंशत: अनुदानित शाळा व महाविद्यालये यांचे विविध प्रश्न शासनदरबारी प्रलंबीत आहेत. विविध प्रकारच्या तपासण्या पुर्ण करत २० टक्के अनुदान प्राप्त शाळा, अनुदानास पात्र झालेल्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, वर्गतुकड्या यांची परत तपासणी करण्यास शिक्षकांकडून विरोध होताना दिसून येत आहे. कायम विनाअनुदानित व कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये हजारो शिक्षक गेल्या २० वर्षांपासून एकही पैसा न घेता काम करीत आहेत. या शिक्षकांना शासनाने २० टक्के अनुदानाचे आश्वासन दिलेले आहे. परंतू आश्वासनाची पुर्तत न करताना उलट माहिती शासनाकडून मागविण्यात येत आहे. त्यामुळे १३ सप्टेंबर २०१९ च्या शासननिर्णयातील अनुदानास पात्र ठरलेल्या, अनुदान मंजूर झालेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व २० टक्के वेतन अनुदान प्राप्त शाळांना प्रचलीत नियमानुसार वाढीव अनुदानाची तरतूद करण्यात यावी, अशी शिक्षकांकडून होत आहे. यासाठी राज्यातील सर्व शिक्षक संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. ऐन बारावी परीक्षेच्या तोंडावर हे शिक्षक आंदोलन करणार असल्याने त्याचा परीक्षा कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रचलित नियमानुसार वेतन अनुदान या संदर्भात शिक्षणक्षेत्रात शिक्षकांसाठी भरीव कामगिरी करणाऱ्या विविध संघटना एकत्र येत आझाद मैदानावर २७ जानेवारीपासून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.परीक्षा कामावर बहिष्कारपुढील महिन्यात बारावीची परीक्षा सुरू होत आहे. दरम्यान, १ फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होत आहे. यासंपूर्ण परीक्षा कामकाजावर तसेच परीक्षा झाल्यानंतर पेपर तपासणीच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिक्षक संघटनेकडून घेण्यात आला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाTeacherशिक्षक