शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

जळगावात १४ हजार क्विंटलची कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 11:57 IST

Cotton Purchase News दोन जिनिंगमध्ये दररोज शंभर गाड्यांचे मोजमाप होऊन २५०० ते ३००० हजार क्विंटलपर्यंत कापूस खरेदी सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद:  महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या वतीने जळगावात दहा दिवसांपासून कापूस खरेदी सुरू झाली असून १६ डिसेंबर पर्यंत १४ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली होती. शासनाच्या हमी भावाप्रमाणे ५७२५ रुपये प्रति क्विंटल या दराने सध्या कापूस खरेदी सुरू असून सुरुवातीला कापूस खरेदीचा वेग कमी होता. आता मात्र दोन जिनिंगमध्ये दररोज शंभर गाड्यांचे मोजमाप होऊन २५०० ते ३००० हजार क्विंटलपर्यंत कापूस खरेदी सुरू आहे.             पणन महासंघाकडे कर्मचाऱ्यांची फार कमतरता असल्याने श्री कोटेक्स व श्री सुपो या दोन्ही जिनिंगवर एकच ग्रेडर यावर्षी काम पाहत आहे. मागील वर्षी दोन जिनिंगवर २  ग्रेडर होते. यावर्षी सीनियर ग्रेडर तथा संकलन केंद्र प्रमुख म्हणून पुरुषोत्तम गावंडे हे काम सांभाळत आहे. एकच ग्रेडर असूनही सुव्यवस्थित नियोजनामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कोणत्याही तक्रारी नाहीत. मागील वर्षी जळगाव कापूस संकलन केंद्रावर विक्रमी दीड लाख क्विंटलची कापूस खरेदी झाली होती.यावर्षी किती कापूस खरेदी होतो यावर उत्पादनाची दिशा निश्चित होणार आहे. सततचा पाऊस व गुलाबी बोंडअळी यामुळे यावर्षी कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली. प्रत्यक्ष कापूस खरेदी नंतर कपाशीच्या उत्पादनात किती घट झाली याचे वास्तव चित्र समोर येईल. दुसरे असे की पणन महासंघाने फार उशिरा म्हणजे डिसेंबरमध्ये कापूस खरेदी सुरू केल्याने शेतकऱ्यांनी आपला कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकला. व्यापाऱ्यांनी हा कापूस गुजरातकडे रवाना करून तेथील जिनिंग मालकांना दिला. त्यामुळे ३० ते ४० टक्के कापूस हा गुजरातला रवाना झाल्याचा अंदाज आहे. तसेच स्थानिक जिनिंग मालकांनी सुद्धा कापूस खरेदीला सुरुवात केली होती. त्यांनी सात ते आठ हजार क्विंटल कापूस खरेदी केला असावा. 

संग्रामपूर येथे संकलन केंद्राचा अभाव जिल्ह्यात घाटाखाली सहा तालुके आहे. त्यापैकी पाच तालुक्यात पणन महासंघ व सीसीआयची कापूस संकलन केंद्रे आहेत. परंतु संग्रामपूर तालुक्यात कापूस संकलन केंद्र नाही. त्यामुळे संग्रामपूर तालुक्यातील कापूस उत्पादकांना जळगाव जामोद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस विक्रीकरिता नोंद करावी लागते आणि जळगाव येथील श्री सुपो जिनिंग व श्री कोटेक्स जिनिंग येथे आपला कापूस विक्री करीता आणावा लागतो. मलकापूर, नांदुरा, खामगाव येथे सीसीआयची कापूस खरेदी आहे, तर जळगाव जामोद, शेगाव येथे पणन महासंघाच्या वतीने कापूस खरेदी सुरू आहे. सीसीआयने नोव्हेंबर महिन्यात प्रथम मलकापूर, नांदुरा येथे कापूस खरेदी सुरू केली नंतर खामगाव केंद्र ओपन केले. पणन महासंघाची कापूस खरेदी प्रक्रिया मात्र डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाली.

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदcottonकापूस