शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी करून चाेरी करणाऱ्यास शिक्षा

By अनिल गवई | Updated: March 25, 2023 17:29 IST

एक वर्ष सश्रम कारावास आणि दोन हजार रूपये दंडाची शिक्षा

खामगाव - स्थानिक शिवाजी नगर पोलीस स्टेशन हद्दीतील गोपाळ नगरात घरफोडी करून चाेरी करणाऱ्या एका आरोपीस एक वर्ष सश्रम कारावास आणि दोन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. हा महत्वपूर्ण निकाल खामगाव येथील प्रथम वर्ग कोर्ट क्रमांक ३ चे न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. राजुरकर यांनी शुक्रवारी सायंकाळी दिला.या संदर्भात घटनेची हकीकत अशी की, फिर्यादी रामेश्वर ज्ञानदेव लाहुडकर यांनी १७ मार्च २०१७ राेजी शिवाजी नगर पो.स्टे.ला फिर्याद दिली होती की ते किराणा दुकान चालवून त्यांचा उदरनिर्वाह करतात. त्यांचे किराणा दुकान हे घरालगत आहे. त्यांनी १६ मार्च १७ रोजी नेहमीप्रमाणे रात्री १०.०० चे सुमारास दुकान बंद केले व दिवस भरात झालेल्या विक्रीचे व उधारीचे लोकांनी दिलेले रू.२५ हजार रूपये गल्ल्यामध्ये ठेवून कुलूप लावून झोपण्यासाठी गेले. तर १७ मार्चच्या रात्री अंदाजे २.३० वा. सुमारास आवाज आल्याने उठून घराबाहेर आले. दरम्यान, लाईट सुरू केले असता गल्लीत राहणारा संदीप नारायण भवरे हा माझे किचन रूममधून पळून जाताना दिसला व मी बंद करून ठेवलेला किचनचा दरवाजा उघडा दिसला. मी निट बघितले असता माझ्या दुकानात जाणाऱ्या दरवाजाचे चाैकटीवर ठेवलेल्या कपाटावरून किराणा दुकानामध्ये त्याने प्रवेश करून गल्ल्यातील ठेवलेले रू.२५ हजार चोरून नेले असल्याचे लक्षात आले. त्याने माझे रू.२५ हजार चोरी केले आहे, अशी फिर्याद दिली.

तपास अधिकारी पोउपनि आनंद मारोती बिचेवार यांनी आरोपीची पोलीस कोठडी घेऊन चोरी झालेल्या रकमेपैकी २० हजार रूपये आरोपीकडून जप्त केले. तपासाअंती आरोपीविरूध्द भक्कम पुरावा मिळून आल्याने दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.अभियोग पक्षातर्फे एकुण ४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यांनी दिलेली साक्ष व वि.सहाय्यक सरकारी अभियोक्ता अजय ज.इंगळे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय ठरवून आरोपीस भादंविचे कलम ४५७ नुसार दोषी ठरवून १ वर्ष सश्रम कारावास व २००० रूपये दंड तसेच कलम ३८० नुसार दोषी ठरवून १ वर्ष सश्रम कारावास व २ हजार रूपये दंड व दंडाची रक्कम न भरल्यास १ महिना साधा कारावासाची शिक्षा शुक्रवारी सायंकाळी सुनावली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा