शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

प्रवासात केली जाते जनजागृती

By admin | Updated: July 20, 2014 23:46 IST

शेगाव वाहकाचा स्तुत्य उपक्रम

उंद्री: 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' महाराष्ट्र शासनाच्या या ब्रिदवाक्याला साद घालत व प्रवासी हेच आमचे दैवत मानत प्रवाशांच्या अडीअडचणी जाणून त्यावर योग्य तो उपाय प्रवाशांचे समाधान करत एस. टी. बसच्या सेवेबद्दल महाराष्ट्र शासनाच्या योजनांची व उपक्रमांची माहिती बसमधील प्रवाशांना देत, प्रबोधनाचा अनोखा पायंडा बसमधील वाहकाने पाडला आहे.सकाळी ठिक ५.४५ मि. संतनगरी शेगाव येथील आगारातून एक एस.टी. बस कुर्ला-नेहरुनगर दादर मुंबई जाण्यासाठी निघते. तेव्हा एस.टी. प्रवाशांना चकीत करणारा पण सुखद आनंद मिळतो. गुडमॉर्निंग, शुभप्रभात असं मृदु स्वरात बोलून हॅप्पी जर्नी, मी कुर्ला नेहरुनगर आगार शंकर गणपत औटी व माझ्या सोबत अहमदनगर तारकपूर आगाराचे चालक सतीष राठोड आपले शेगाव-कुर्ला नेहरुनगर बसमध्ये मन:पूर्वक स्वागत आहे. आपण आता संतनगरी शेगाव येथून कुर्ला नेहरुनगर येथे प्रवास करीत आहोत. आपण दादर मुंबईला ठिक रात्री १0 वाजता पोहचू.त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या प्रवाशांसाठी काय योजना व उपक्रम आहेत त्याविषयी प्रवाशांना माहिती देतात. विदर्भ पंढरी असलेल्या संतनगरी शेगाव विषयी व संस्थान विषयी माहिती देऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आरामदायी व सुरक्षित प्रवास करायचा अशी विनंती करतात. माझा सर्व बंधुभगिनी, जेष्ठ व सर्वश्रेष्ठांना माझा नमस्कार. एस.टी. बस प्रवास करीत असतांना आपल्या स्वत:ची व सोबत असलेल्या अबालवृध्द यांची कशी काळजी घ्यावी, एस.टी. बस आपली समजून सर्वांनी स्वच्छता राखावी, इतकेच नव्हे तर मधुमेही रुग्णांसह इतरांना काही त्रास असल्यास व गरज भासल्यास मला निसंकोचपणे सांगा व जेष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी बस केव्हाही थांबविण्यात येईल असे आश्‍वासनही ते प्रवाशांना देतात व संतनगरी शेगावची महती कथन करतात.एस.टी. महामंडळाच्या सेवेबद्दल सतत टिका होत असतांना अशी उत्तम, आपुलकीची व आपल्या दैवता प्रती असलेली एस.टी. वाहकाची निष्ठा दिसून येते. शंकर गणपत औटी व त्यांना सर्मथ साथ देणारे सतीष राठोड हे उत्कृष्ट सेवा, सामंजस्य व जिव्हाळा दाखवून प्रवाशांना अचंबित करतात. प्रत्येक दोन तासानंतर शंकरराव हे परिवहन महामंडळाच्या उपक्रमांची व योजनांची माहिती देत, जनजागृती करतात.