जात प्रमाणपत्रासाठी रोखला राष्ट्रीय महामार्गआदिवासी कोळी महादेव समाजाचे आंदाेलन

By सदानंद सिरसाट | Published: January 11, 2024 04:52 PM2024-01-11T16:52:27+5:302024-01-11T16:56:38+5:30

Buldhana News: जात प्रमाणपत्रासाठी रोखला राष्ट्रीय महामार्गआदिवासी कोळी महादेव समाजाचे आंदाेलननरवेल (बुलढाणा) : जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे आदिवासी कोळी महादेव जमातीचे जात प्रमाणपत्र सुलभतेने द्यावे,

Protest of Adivasi Koli Mahadev Samaj blocked national highway for caste certificate | जात प्रमाणपत्रासाठी रोखला राष्ट्रीय महामार्गआदिवासी कोळी महादेव समाजाचे आंदाेलन

जात प्रमाणपत्रासाठी रोखला राष्ट्रीय महामार्गआदिवासी कोळी महादेव समाजाचे आंदाेलन

- सदानंद सिरसाट
बुलढाणा - जात प्रमाणपत्रासाठी रोखला राष्ट्रीय महामार्गआदिवासी कोळी महादेव समाजाचे आंदाेलननरवेल (बुलढाणा) : जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे आदिवासी कोळी महादेव जमातीचे जात प्रमाणपत्र सुलभतेने द्यावे, यासाठी दि. २ जानेवारी रोजी आदिवासी कोळी महादेव जमातीच्या बांधवांनी एल्गार अन्नत्याग उपोषणास सुरुवात केल्यानंतर दहा दिवस उलटूनही उपोषणकर्त्यांची शासनाने कुठल्याच प्रकारची दखल घेतली नाही.

त्यामुळे आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीने हायवे क्रमांक सहावर तांदुळवाडी येथील पुलावर गुरुवारी दुपारी १ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीने प्रमाणपत्रासाठी एल्गार अन्नत्याग उपोषण सुरू आहे. अमरावती विभाग बेरार प्रांतमधील आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र सुलभरीत्या देण्यात यावे, तसेच पाल पारधी, राजपारधी, गावपारधी, हरण शिकार पारधी हे विभक्त जाती-अ व्हिजेएमध्येे येत असून, त्यांनी नाम सदृशाचा फायदा घेत अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळविले. ते प्रमाणपत्र रद्द करून जप्त करावे, या मागण्यांसाठी गणेश इंगळे, गजानन धाडे, संदीप सपकाळ उपोषणास बसले आहेत; परंतु आदिवासी कोळी महादेव जमातीच्या मागण्याकडे शासन-प्रशासन स्तरावरून दुर्लक्ष होत असल्याने आदिवासी कोळी महादेव जमात संतप्त झाली. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई-नागपूर हायवे नंबर सहावर तांदुळवाडी येथील पुलाजवळ रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे अनेक तास वाहतूक विस्कळीत झाली. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या. यापुढे शासन-प्रशासनाने लक्ष न दिल्यास यापेक्षाही उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.

यावेळी कोळी महादेव जमातीचे कार्यकर्ते पुरुषोत्तम झाल्टे, ज्ञानेश्वर खवले, विश्वनाथ पुरकर, वासुदेव सोनवणे, तुकाराम झाल्टे, श्रीकृष्ण तायडे, गंगाधर तायडे, लखन सपकाळ, मधुकर धाडे, गीता कठोरकार, सागर सोनवणे, गणेश सुरळकर, शांताराम धाडे, बाळू पाटील, भागवत घाईट, विलास कांडेलकर, विकास धाडे, राजू शिरसाट, अमित धाडे, संदीप लष्करे या कार्यकर्त्यांना दसरखेड एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमराज कोळी यांनी १८ कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पोलिस स्टेशनमध्ये स्थानबद्ध केले. यावेळी मलकापूर तालुका तसेच बुलढाणा जिल्ह्यातील कोळी महादेव जमातीचे हजारो लोक उपस्थित असल्याने पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली.फोटो :

Web Title: Protest of Adivasi Koli Mahadev Samaj blocked national highway for caste certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.