शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या निषेधार्थ सोनाळ्यात कडकडीत बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 14:36 IST

सोनाळा पोलिसांनी पोलीस अधीक्षकांना चुकीचा अहवाल सादर करीत गावाची बदनामी केल्याने व्यापाऱ्यांनी गुरुवारी दिवसभर आपली दुकानं बंद ठेवली आहेत.

ठळक मुद्देसोनाळा पोलिसांनी पोलीस अधीक्षकांना चुकीचा अहवाल सादर करीत गावाची बदनामी केल्याने व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवलीगावकऱ्यांच्यावतीने सोनाळा बंदची हाक देण्यात आली होती. त्यास व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. पोलिसांच्या चुकीच्या अहवालाने यात्रेला गालबोट लागल्याने गावकरी आक्रमक झाले.

सोनाळा ता. संग्रामपूर - सोनाळा पोलिसांनी पोलीस अधीक्षकांना चुकीचा अहवाल सादर करीत गावाची बदनामी केल्याने व्यापाऱ्यांनी गुरुवारी दिवसभर आपली दुकानं बंद ठेवली आहेत. गावकऱ्यांच्यावतीने सोनाळा बंदची हाक देण्यात आली होती. त्यास व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. 

सोनाळा येथे श्री सोनाजी महाराज यात्रा महोत्सव सुरू आहे. ही यात्रा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे. येथे सर्व धर्माचे लोक एकजुट येऊन सोनाजी महाराजांचा हा भव्य उत्सव पार पाडतात. शेकडो वर्षापासून सुरू असलेली ही यात्रा आजतागायत अबाधित सुरू आहे. पोलिसांच्या चुकीच्या अहवालाने यात्रेला गालबोट लागल्याने गावकरी आक्रमक झाले. २६ नोव्हेंबर रोजी सोनाळा यात्रेत लोकनाट्य मंडळ आले. पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. २७ नोव्हेंबररोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान ग्रा.प. पदधिकारी सदस्य, तंटामुक्ती समिती सदस्य गावकऱ्यांसह ठाणेदारांना भेटले. त्यानंतर २७ नोव्हेंबररोजी दुपारी 3 वाजता दरम्यान लोकनाट्य मंडळाचे काही संचालक व गावातील एक शिष्ट मंडळ पोलीस अधिक्षक बुलढाणा यांना भेटायला गेले.

पोलीस अधीक्षकांनी सर्वांना सोबत चर्चा करीत सोनाळा पोलिसांच्या अहवालाचा उल्लेख करीत सांगितले की गाव अतिसंवेदशील असुन त्याठिकाणी वाद होण्याची संभावना असल्याचे नमुद केले. त्यामुळे पोलिस प्रशासन लोकनाट्य तमाशाला परवानगी देऊ शकत नाही. बुलढाणा येथे चर्चा सुरू असताना लोकनाट्य कलाकारांनी संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान वाद्य वाजवण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी नागरीकांची गर्दी झाली होती. सोनाळा पोलिसांनी कलाकारांना वाद्य बंद पाडण्यास भाग पाडले. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. शेकडो वर्षापासून शांततेत व राष्ट्रीय एकात्मतेची प्रतिक असलेल्या या सर्व धर्मीय यात्रेला गालबोट लागले. पोलिसांचा कायम यात्रा बंद पाडण्याचा डाव असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी गुरुवारी व्यापाऱ्यांनी नागरिकांची सोनाळा बंद हाक मान्य करीत दुकाने बंद ठेवली. यात्रा सुरू असताना गावातील एकही दुकान सुरू नसल्याचे दिसून येते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliceपोलिस