शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

बेहिशेबी युरीया वाटप प्रकरणी कृषी केंद्र चालकावर कारवाई प्रस्तावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 4:32 PM

जिल्ह्यातील १३० युरिया विक्रेत्यांच्या दुकानाचीही तपासणी करण्यात आली आहे.

बुलडाणा: बेहिशेबी युरीया वाटप प्रकरणी शेंबा येथील कृषी केंद्र चालकावर कारवाई प्रस्तावीत करण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणात जवळपास एक हजार १४० शेतकºयांना वाटप करण्यात आलेल्या युरीयाचीही कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाकडून तपासणी करण्यात आली आहे.नांदुरा तालुक्यातील शेंबा येथील एका कृषी केंद्रावर चार शेतकºयांना अवाजवी स्वरुपात एक हजार २८ गोण्या युरीयाचे खत वाटप करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले होते. प्रकरणी कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाने चौकशी सुरू केली होती. या प्रकरणात नांदुरा व मोताळा तालुक्यातील शेतकºयांची प्रत्यक्ष चौकशी करून वाटप करण्यात आलेल्या खताच्या पावत्यांचा मेळही तपासण्यात आला. त्यात पावत्यांनुसार खत योग्य पद्धतीने वाटप करण्यात आल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. मात्र कोरोना संसर्गाच्या काळात पॉस मशिनवर शेतकºयांचे थंब न घेण्याच्या सुचना होत्या. त्यामुळे कृषी केंद्र चालकाने मोजक्याच शेतकºयांच्या नाववर युरीया घेतल्याचे दाखवले. त्यातून हा सर्व घोळ झाल्याचे तपासात समोर आले असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान युरीया खताच्या वाटपाच्या नोंदी संगणकावर घेण्यात आल्या असल्याचे समोर आले. या नोंदी करताना कृषी केंद्र चालकाने शॉर्टकट वापरल्याचे तपासात समोर आल्याचे कृषी विभागातील अधिकाºयाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे एक मे २०२० पासून वाटप झालेल्या युरीया खताची तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, युरीया खत वाटपाच्या योग्य नोंदी न ठेवता त्यात शॉर्टकट वापरल्याप्रकरणी शेंबा येथील कृषी केंद्र चालकावर आता कारवाई प्रस्तावीत करण्यात आली असल्याची माहिती कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दरम्यान, या प्रकरणात कृषी विभागाकडून जिल्ह्यातील १३० युरिया विक्रेत्यांच्या दुकानाचीही तपासणी करण्यात आली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAgriculture Sectorशेती क्षेत्र