वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव लवकरच मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:29 AM2021-01-15T04:29:06+5:302021-01-15T04:29:06+5:30

बुलडाणा : जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या पायाभूत सोयी-सुविधा व वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषयांसाठी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मुंबई स्थित ...

The proposal for a medical college will be sorted out soon | वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव लवकरच मार्गी लागणार

वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव लवकरच मार्गी लागणार

Next

बुलडाणा : जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या पायाभूत सोयी-सुविधा व वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषयांसाठी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मुंबई स्थित मंत्रालयातील समिती सभागृहात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासमवेत बैठक घेतली. यावेळी जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव लवकरच मार्गी लावला जाईल, असे आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले.

यावेळी आरोग्‍य मंत्री यांनी साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालयासाठी निधी वितरित केला असल्याचे सांगितले. तसेच या ग्रामीण रुग्णालयासाठी निविदा काढण्यात यावी, असेही संबंधित अधिकाऱ्यांना सूचित केले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील शासकीय निवासस्थाने बांधण्यासाठी लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता दिली जाईल, असेही सांगितले.

ज्या प्रातमिक आरोग्य केंद्रासाठी जागेची अडचण आहे, त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना अवगत करावे. तसेच जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या जागेचा प्रश्न मार्गी लावावा, असा निर्णय घेण्यात आला.

जिल्ह्यात नऊ नविन प्राथमिक आरोग्य केंद्रे

जिल्ह्यात नऊ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे व ५८ उपकेंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. या सर्वांचे प्रस्ताव ३१ जानेवारी २०२१ पूर्वी सादर केले जातील, असे सहसंचालक आरोग्य यांनी बैठकीदरम्यान सांगितले. बैठकीला आरोग्य विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: The proposal for a medical college will be sorted out soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.