शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी घेतल्या ज्ञानगंगा धरणात उड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 12:24 IST

farmers jumped into lower dnyanganga the dam शेतकऱ्यांनी शुक्रवारी ज्ञानगंगा धरणामध्ये उड्या घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : निम्न ज्ञानगंगा प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना मोबदल्याची रक्कम मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने  त्रस्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी ज्ञानगंगा धरणामध्ये उड्या घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे, बुलडाणा जिल्ह्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाखल होत असतानाच शेतकऱ्यांनी केलेल्या या कृतीमुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील निमकवळा येथील निम्न ज्ञानगंगा प्रकल्प-२ बृहत लघुपाटबंधारे योजनेंतर्गत धरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आजपर्यंत मोबदला मिळाला नाही. त्यामुळे गेल्या २६ जानेवारीपासून शेतकऱ्यांनी प्रकल्पस्थळी आमरण उपोषण सुरू केले. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांनी शुक्रवारी रोजी जलसमाधी घेत असल्याचे जाहीर केले होते. शुक्रवारी पहाटे ५ वाजता पोलिसांनी अवथळे यांना ताब्यात घेऊन खामगाव पोलिस स्टेशनला आणले.  यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत धरणांमध्ये उड्या घेतल्या. शेतकऱ्याच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अवथळे यांना पोलिसांनी पुन्हा उपोषण स्थळी नेले. यावेळी अनंता वाघमारे, परमेश्वर निमकर्डे  या शेतकऱ्यांनी धरणात उड्या घेतल्या. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना स्थानबद्ध केले. यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संत, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार शीतल रसाळ यांनी प्रकल्पस्थळी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. चर्चेदरम्यान या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मोबदल्याच्या प्रश्नावर तोडगा काढणे शक्य नसल्याचे सांगत शेतकऱ्यांना न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला. यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक होत, मोबदला मिळत नाही, संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठे‌वण्याचे सांगितले. 

पाच जणांना रुग्णालयात हलवलेउपोषणकर्त्यांपैकी सुरेंद्र राठोड, प्रकाश धोटे,अनंता वाघमारे, रमेश मुंडे, श्रीराम मुंडे या ५ शेतकऱ्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आंदोलनाला १२ दिवस उलटले आहेत. 

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरी