शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात प्राध्यापकांचा संप; महाविद्यालयाचे काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 17:59 IST

बुलडाणा: सातवा वेतन आयोग लागू करावा यासह प्रलंबीत विविध मागण्यांसाठी राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे.

बुलडाणा: सातवा वेतन आयोग लागू करावा यासह प्रलंबीत विविध मागण्यांसाठी राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामध्ये जिल्ह्यातील सुमारे २०० प्राध्यापकांनी सहभाग घेतला असून महाविद्यालयांचे कामकाज बंद ठेवून शासनाच्या शैक्षणिक धोरणांचा निषेध नोंदविला. राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, अनेक दिवसांपासून रखडलेल्या मागण्या, पदभरतीवर लादलेली बंदी, थकित ७१ दिवसांचे वेतन मिळावे, नविन प्राध्यापकांना जुनीच पेन्शन योजना सुरू करण्यात यावी, अभ्यास मंडळ नियुक्त्यामधील गोंधळ दूर करावा, तासिका तत्त्वावरील मानधन वाढवावे यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील प्राध्यापकांची संघटना एमपुक्टोच्यावतीने हा संप पुकारण्यात आला आहे.  एमपुक्टोचे जिल्ह्यातील जवळपास २५० प्राध्यापक असून यापैकी २०० प्राध्यापकांनी या आंदोलनात सहभाग घेऊन महाविद्यालयीन कामकाज बंद ठेवले आहे. यापूर्वीही अनेकवेळा प्राध्यापक संघटनांनी आंदोलन केले; मात्र शासनाकडून काहीच दखल घेतल्या जात नसल्याने मंगळवारला कामबंदच्या मार्गाने आंदोलन पुकारण्यात आल्याची माहिती वरीष्ठ महाविद्यालय प्राध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. मधु सोनुने यांनी दिली. 

विविध संघटनांचा सहभाग जिल्ह्यातील अनेक प्राध्यापकांनी बेमुदत कामबंद आंदोलन करून  एमपुक्टो या महाराष्ट्रातील संघटनेस पाठींबा दिला आहे. अमरावती विद्यापीठांतर्गत येणाºया संघटना, सी. एच. बी. प्राध्यापक, नेटसेट प्राध्यापकांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. तसेच जिल्ह्यातील प्राचार्य फोरम व संस्था चालकांनी सुद्धा आंदोलनास संपूर्ण पाठींबा जाहीर केल्यामुळे काही महाविद्यालयात १०० टक्के काम बंद आहे. 

प्राध्यापकांचा संघर्ष सुरूचशासनदरबारी असलेल्या प्रलंबीत मागण्या निकाली काढण्यासाठी राज्यभरातील प्राध्यापकांकडून २ जुलै २०१८ पासून वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन पुकारण्यात येत आहेत. ६ आॅगस्टला प्राध्यापकांनी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध नोंदविला. त्यानंतरही अनेकवेळा धरणे आंदोलन, जेलभरो आंदोलन, एकदिवशीय सामुहिक रजा आंदोलन केले. परंतू शासनाकडून त्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याने प्राध्यापकांचा आपल्या मागण्यांसाठी संघर्ष सुरूच असल्याचे दिसून येते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcollegeमहाविद्यालयStrikeसंप