शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
2
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबुल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
3
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
4
BMC Election 2026: नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
5
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पंना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
6
Akola Municipal Election 2026: इच्छुकांची धाकधूक वाढली, भाजपची यादी शेवटच्या क्षणी; कारण...
7
सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' अन् आलियाचा 'अल्फा' यांच्यात क्लॅश! 'हा' सिनेमा होणार पोस्टपोन?
8
"जयपूरमध्ये बॉम्बस्फोट होणार!", मध्यरात्री फोन करून धमकी दिली; पोलिसांनी पकडल्यावर वेटर जे म्हणाला... 
9
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
10
Astro Tips: तुमच्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी आहे का? नसेल तर 'हे' नक्की वाचा!
11
मुंबईत उमेदवार भाजपचा अन् चिन्ह मात्र शिंदेसेनेचे? आता उच्च पातळीवर होणार चर्चा
12
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
13
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
14
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
15
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
16
वर्षभरात बॉलिवूडची बांधकाम उद्योगात  तब्बल एक हजार कोटींची उलाढाल; ८५५ कोटींच्या व्यवहारासह जितेंद्र पहिल्या क्रमांकावर
17
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
18
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
19
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी शिक्षकांच्या वेतनाचा तिढा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 18:06 IST

गेल्या तीन वर्षापासून या शिक्षकांना वेतन पथक अधिक्षक (प्राथमिक) कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. 

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: जिल्ह्यात प्राथमिक खाजगी अनुदानीत शाळा ६८ आहेत. त्या शाळांवरील सुमारे ८० शिक्षकांच्या थकीत वेतनाचा तिढा सुटता सुटत नसल्याचे दिसून येते. इतर काही थकीत देयकांचाही प्रश्न प्रलंबीतच आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून या शिक्षकांना वेतन पथक अधिक्षक (प्राथमिक) कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. खाजगी अनुदानीत शाळांवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या वेतनाची जबाबदारी ही वेतन पथक अधिक्षक कार्यालयाची असते. ज्ञानदान केल्यानंतर शिक्षकांना त्यांचे नेमून दिलेले वेतन दरमहिना न मिळने हे शिक्षण व्यवस्थेचे दुर्दैव आहे. हा प्रकार बुलडाणा जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षण वर्तुळात सध्या वाढलेला आहे. जिल्ह्यातील ६८ खाजगी अनुदानीत प्राथमिक शाळांवर ५०० च्यावर शिक्षक कार्यरत आहेत. त्यातील ८० शिक्षकांचे वेतन २०१६ पासून थकीत आहे. सोबतच वैद्यकीय व इतर देयकेही थकीत राहत आहेत. त्याचा प्राथमिक वेतन पथक विभागाकडून वेळोवेळी पाठपुरावा केला जात नसल्याने शिक्षकांच्या वेतनाची ही समस्या मार्गी लागत नसल्याची ओरड शिक्षकांमधून होत आहे. थकीत देयके व शिक्षकांचे थकीत वेतन शिक्षकांच्या खात्यात जमा करावे, यासाठी शिक्षक संघटनांकडूनही वारंवार मागणी करण्यात आलेली आहे. परंतू विभागाच्या दुर्लक्षामुळे खाजगी प्राथमिक शिक्षकांना वेतनासाठी प्रतीक्षाच करावी लागते. सध्या प्राथमिक वेतन पथक अधिक्षकाचे पद रिक्त असल्याने वरीष्ठ लिपीक काम पाहतात. यासंदर्भात वरीष्ठ लिपीकांना संपर्क केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. 

 

खाजगी अनुदानीत प्राथमिक शाळेवरील काही शिक्षकांचे २०१६ पासून वेतन थकीत आहे. वैद्यकीय देयके सुद्धा थकीत आहेत. सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता मिळालेला नाही. शिक्षकांचा हा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, अन्यथा संघटना आंदोलन छेडेल. -अमोल तेजनकर, राज्य प्राथमिक शिक्षक संघ, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाTeacherशिक्षक